प्लिज डोन्ट लव्ह किकी
अमेरिकेत सध्या एक
चॅलेंज खूप गाजत आहे. सोशल मिडीया आल्यापासून अनेक चांगल्या गोष्टी होवू लागल्या तसेच
या माध्यमाचा वापर करून तरुणाई नव-नवीन थेरं करू लागली. सुरुवात झाली ती “आईस बकेट" चॅलेंज ने. या आव्हानात थंड पाण्याची बादली डोक्यावर ओतून दाखवायची ते चलचित्र
आपल्या मित्रांना फॉरवर्ड करायचे मग त्याने सुद्धा तसे करायचे. अनेक सिनेतारक-तारकांनी सुद्धा हे आव्हान करून दाखवले होते त्यानंतर आले ते पोकेमॉन व त्यानंतर
ब्ल्यू व्हेल आणि आता नवीन टूम निघाली ती म्हणजे “किकी डू यु लव्ह मी?” हे गाणे.
अमेरिकेत हे गाणे गाजले. धावत्या कार मधून उतरायचे, या गाण्यावर नाच करायचा ते
गाणे चित्रित करायचे व आपल्या मित्रांना व्हॉटस अॅपवर फॉरवर्ड करून त्याला असा नाच
करण्याचे चॅलेंज द्यायचे.सध्या अमेरिकेत तरुणाईने याची धूम चालवली आहे.धावत्या गाडीतून
उतरून या गाण्यावर थिरकतांना अनेक नाच्या तरुण-तरुणींचे अपघात सुद्धा झाले. आता ही टूम भारतात
सुद्धा येणार किंबहुना आली आहे. पोलीस प्रशासन या बाबत जागरूक झाले आहे. भारतातील
तरुणाई सुद्धा असले नसते उपद्व्याप हमखास करणार.कारण पाश्चात्त्यांचे त्यांचे
नेमके ‘एन्जॉय’ करण्याचे तेवढे अनुकरण करण्यात आपले तरुण चांगले वाकबगार आहेत. पाश्चात्त्यांचे
चांगल्या बाबींचे अनुकरण टाळून त्यांच्यातील वाईट तेवढे त्वरीत आत्मसात करायचे हे आपल्या
देशात पूर्वी पासून चालत आले आहे. आता दीड–दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात "आय ए एस" दाम्पत्यांचा एकुलता एक
हुशार मुलगा ब्ल्यू व्हेल या गेमच्या चॅलेंज ला बळी पडला होता. पोकेमॉनमुळे सुद्धा
अनेक अपघात झाले आहेत. परंतू “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” हे ध्यानात न ठेवता तरुण
सोशल मीडियातील अशा जीवघेण्या चॅलेंजसला बळी पडतच आहेत. सध्या लहान मुले ,तरुण पालकांच्या
ऐकण्यात नाहीत.बापाचा दरारा ईतिहास जमा झाला. कार्यालयातून बाप घरी येण्याची वेळ
झाली, किंवा त्याच्या गाडीची चाहूल लागली की घरात पळणारा मुलगा आता बाप झाला आहे
परंतू त्याची मुले मात्र तो झोपल्यावर घरात दाखल होत आहेत. कधी नाईट रायडींग करून
तर कधी झिंगून. परंतू आपल्या बापाला वचकून असणा-या या आताच्या बापाची मात्र
पोरांना काही बोलण्याची हिम्मत राहिली नाही. आज-काल पालकांना पाल्याचे ऐकावे
लागते. ते म्हणतील तसे करावे लागते. आजचे हे तरुण , लहान मुले नकार पचवू शकत नाही.
पाल्य जीवाचे काही बरे वाईट करेल अशी भीती या पालकांना असते .कारण तसे किस्से घडेल
सुद्धा आहेत. म्हणून पालक सुद्धा पाल्यांना आता जास्त रागे भारत नाही, शाळेत सुद्धा
शिक्षा नाहीत म्हणून मग मुले अतिशय व्दाड होत
चालली आहेत. त्यातच 1760 लांब अंतरावर असलेली क्लासेस,हॉबी क्लासेस येथे जाण्यासाठी
म्हणून मग लहान वयातच त्यांच्यासाठी दुचाक्या,
चारचाक्या घेतल्या जातात. गाड्या घेतल्या की हे पोर स्वैर होऊन भरधाव वेगात गाड्या
पिटाळतात, त्यांना जणू गाडीच्या फक्त अॅकस्लरेटरचाच उपयोग करणे ठाऊक असते. कुणी कडून
काहीही वाहन अथवा व्यक्ती अथवा जनावर येऊ शकते याचे काहीही भान न ठेवता हे षोडश वर्षीय
भरधाव वेगाने गाड्या निव्वळ दामटत असतात, धोपटत असतात. भरधाव वेगामुळे हे विद्यालयीन
महाविद्यालयीन तरुण ऐन तारुण्यात अपघातास बळी पडतात, जायबंदी होतात. त्यातच निघतात
हे “किकी” सारखे नसते थेरं, नसते उपद्व्याप. कोण कुठला गायक हे गाणे म्हणतो काय, आपण तारतम्य सोडून धावत्या कार मधून उतरून त्यावर नाचतो काय, आपल्या घरी आपले कुटुंबीय आहे, आपले करीअर आहे नसती आफत ओढवू
शकते, जन्माचे पंगत्व येऊ शकते याचा काहीही
एक विचार न करता तरुण हे किकी चॅलेंज स्वीकारत आहेत. यांना चांगले सांगितलेले सुद्धा आवडत नाही. तरी या लेखाद्वारे सांगावेसे वाटते की ,”किकी” गाण्यावर खुशाल नाचा परंतू घरात . रस्त्यांवर
नाचून स्वत;चा किंवा किंवा दुस-यांचा जीव धोक्यात
आणू नका. अकॅॅडेमीक चॅलेंजेस स्विकारा. “किकी डू यु लव्ह मी" म्हणा परंतू
“प्लिज प्लिज डोन्ट लव्ह टू डान्स ऑन रोड ऑन किकी साँग”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा