Click "Follow" Button below To Follow this Blog

०२/०१/२०१९

Article on viriling positivity message by Mr PM in "Man ki Baat" on last sunday of December 2018

खरेच सकारात्मकता व्हायरल व्हावी   

     समाजात सहसा नकारात्मक बातम्या, संदेश हेच जास्त पसरत असल्याचे चित्र सर्वसामान्य लोक पाहतच आहेत. सांप्रत काळात तर हे फारच वाढले आहे. आपण दिवसेंदिवस तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत होत असून   मनांनी मात्र संकुचित होत आहोत. “अवघे विश्वची माझे घर” “वसुधैव कुटुंबकम” अशी शिकवण असलेल्या आपल्या देशात आपण माझी जात , माझा समाज , माझे कुटुंब, माझा लाभ यात गुरफटलो आहोत. नकारात्मक बाबींवर जास्त लक्ष केंद्रीत करीत आहोत. त्यामुळेच पंतप्रधानांच्या यंदाच्या “मन की बात” या कार्यक्रमातून “सकारात्मकता गोष्टी व्हायरल करू या” असा संदेश पंतप्रधानांनी दिला. “मन की बात” चा हा आजरोजीपावेतोचा 51 वा भाग होता. गत वर्षात देशाने खूप काही मिळवले असेही पंतप्रधानांनी उद्घृत केले. आता विरोधक मन की बात ची खिल्ली उडवत असले तरी पंतप्रधानांनी मात्र या उपक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधून जनतेला आपलेसे केले आहे. मोदींच्या या आवाहनाला जनतेने, तरुणांनी पुरेपूर प्रतिसाद देणे जरूरी आहे. सकारात्मकता असेल तर अनेक गोष्टी सहज साध्य होतात. Positive Attitude असेल तर आपली वाटचाल सुखकर होते, आपल्या भोवताली चांगले वातावरण निर्माण होते, आणि त्याने आपली अनेक कार्ये विना अडथळा पार पडू शकतात. यशप्राप्ती होते. येत्या 12 तारखेला स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी होणार आहे. स्वामीजींची जयंती युवक दिन म्हणून साजरी केली जाते. स्वामीजींनी म्हटले होते “मला फक्त आदर्श असे काही युवक द्या मी जग बदलवू शकतो” स्वामीजींना युवकांनी सुद्धा सकारात्मक असावे असे वाटत असे. पंतप्रधानांनी सुद्धा देशातील नकारात्मक वातावरण पाहून , “ढेशात राहायची भीती वाटते “ असली नसती नकारात्मक वक्तव्ये करतांना पाहून “सकारात्मकता गोष्टी व्हायरल करू या” असे आवाहन देशवासीयांना करावेसे वाटले असणार. ते बरोबर सुद्धा आहे. सर्वांचे लाडके दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलजी हे सुद्धा मोठे सकारात्मक होते. अनेक प्रसंगी त्यांनी विरोधी पक्षातील, इतर पक्षातील लोकांच्या चांगल्या गोष्टीं बाबत, योग्य निर्णयांबाबत वाखाणणी केली आहे. देशातील वातावरण, नेते, लोक, माध्यमे सकारात्मक बाबी प्रसृत करतील तर निश्चितच एक चांगले वातावरण निर्माण होईल. तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. जनतेचे मनोबल वाढेल , सैन्याचे मनोबल वाढेल. त्यामुळे इंग्रजी नवीन वर्षाच्या आरंभी पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक होण्याचा प्रयत्न करू या. सकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष केंद्रीत करू या. “जे जे उत्तम, उदात्त , उन्नत महन्मधुर ते ते” पाहू या. जुन्या संकल्पना , बुरसटलेले विचार , जाती-पाती चा भेद, नकारात्मक भावना हे सर्व  त्यागू या व “सकारात्मकता गोष्टी व्हायरल करू या” असे New Year Resolution सर्वांनी करावे व इतरांना तसे करण्यास प्रोत्साहीत करावे.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा