“हमे
आपसे भी जुदा कर चले.....”

“मोहोब्ब्त बडे काम की चीज है” , 80 च्या दशकात “ये
मुलाकात एक बहाना है” ,“आंखोमे हमने आपके सपने सजाये” हलके-फुलके
“गापुची गापुची गम गम” उमरावजान मधील “दिल चीज कया है” ,“इन आंखोकी मस्ती” ही गीते तर अजरामर झाली आहेत. “चाँदनी रातमे एक बार तुम्हे देखा है”, “आंखोमे हमने आपके सपने”, नूरीतील गीते, रजिया सुलतान मधील “ऐ दिले नादान“ व त्यातील मुगलकालीन संगीत अप्रतिम,चीरस्मरणीय व श्रवणीय आहे. खय्याम यांचे वैशिष्टय म्हणजे त्यांनी
संगीतबद्ध केलेले काही सिनेमे जरी यशस्वी झाले नसले तरी खय्यामचे संगीत मात्र
यशस्वीच राहीले आहे. गजलांच्या जवळपास जाणा-या परंतू तितक्याच शास्त्रीय संगीताचा
आधार असलेल्या, हृदयाला भीडणा-या चाली लावणारे संगीतकार
म्हणून त्यांची ख्याती होती. राजेश खन्नाने तर त्यांच्या संगीतावर खुश होऊन
त्यांना कार भेट दिली होती असा किस्सा आहे.किशोरकुमार, लता
मंगेशकर यांनी त्यांच्या संगीत निर्देशनात अनेक हीट गाणी दिली. खरे तर जुन्या
पिढीतील हे सर्व आताच्या नवीन पिढीला काही माहीत सुद्धा नसेल परंतू चाळीसीतील
किंवा त्यापेक्षा वडील मंडळींनी जुनी गाणी
ऐकली आहेत. या गीतांचा करीष्मा मात्र अद्याप कायम आहे. आज तसे संगीत नाही, नवीन पिढीतही अनेक गुणी कलावंत आहेत. परंतू लोकांची अभिरुची बदलली आहे.
खय्याम यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार सुद्धा मिळाला होता. त्यांनी संगीत
क्षेत्रासाठी एक ट्रष्ट सुद्धा स्थापन केला व त्याला त्यांनी स्वकमाईतील मोठा वाटा
देणगी म्हणून दिला आहे. जुन्या पिढीतील अनेक प्रतिभावंत आपल्यातून गेले काल खय्याम
सुद्धा गेले त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकता-ऐकता “हमे आपसेभी जुदा कर चले.....” ही
त्यांनीच संगीतबद्द केलेल्या गीतातील ओळ आठवत होती.
सुंदर लेख आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई 🙏
हटवा