“महाराजा
हरिसिंग, डॉ आंबेडकर आणि कलम 370”
केंद्र सरकारने दि 05
ऑगस्ट 2019 रोजी काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले तसेच जम्मू काश्मीर
पासून लड्डाख वेगळे केले गेले. या नंतर भारतातच काय तर जगात एकच ऊहापोह होत आहे.
सर्वसामान्य जनतेमध्ये मात्र आनंदाचे भरते आले आहे.भारताला स्वातंत्र्य प्राप्त
झाल्यानंतर काश्मीर , 370 कलम, 35 ए हे सर्व चर्चिल्या जात
होते. काश्मीर मध्ये फुटीरतावादी व दहशतवाद्यांनी नेहमी तणावाचे वातावरण ठेवले. या
सर्व पार्श्वभूमीवर स्मरण होते ते काश्मीरचे राजा महाराजा हरिसिंग व ङॉँ आंबेडकर
यांचे. हरिसिंग हे काश्मीरचे ऐश्वर्य संपन्न राजे होते. विदेशात शिक्षण,अत्यंत विलासात जीवन व्यतीत करणारे असे ते होते. तीन राण्यांपासून
पुत्रप्राप्ती झाली नाही म्हणून त्यांनी चौथे लग्न केले व त्या चतुर्थ राणी पासून
त्यांना कर्णसिंह हे पुत्र झाले. महाराजा हरिसिंग यांनी काश्मीर राज्यासाठी अनेक
चांगले निर्णय घेतले.काश्मीर मधील महिलांना मुंबई, कोलकाता
येथे विकले जात होते म्हणून त्यांनी महीला अपहरण कायद्यात 3 ऐवजी 7 वर्षांच्या
शिक्षेची तरतूद केली होती. सर्व लहान मुलांना त्यांनी 1930 मध्येच प्राथमिक शिक्षण
सक्तीचे केले होते, ग्रामपंचायत,
बँकांचे निर्माण केले होते. 1947 मध्ये पाकीस्तानी टोळ्यांनी हल्ला केल्यावर व पाकिस्तानचा
भविष्यातील धोका ओळखून त्यांनी काश्मीरचे भारतात विलिनीकरण करण्याच्या करारावर
स्वाक्षरी केली. परंतू त्या करारात काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असावा असे काही
म्हटले नव्हते. विशेष दर्जा असावा हे काश्मीरचे तत्कालीन पंतप्रधान व नेहरू
ज्यांना स्वत:चा भाऊ म्हणत त्या शेख अब्दुल्ला यांचे टुमणे होते. परंतू डॉ॰ बाबासाहेब
आंबेडकर यांनी असा मसुदा बनवण्यास सक्त विरोध केला व असा विशेष दर्जा देणे देशाच्या
हिताचे नाही असेही ते म्हणाले होते. आंबेडकर तेंव्हा कायदा मंत्री तसेच संविधान
मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी कलम 370 बनवण्यास स्पष्ट नकार दिला होता व
त्यांना ते असण्याची गरज सुद्धा वाटत नव्हती. बाबासाहेबांच्या विरोधांनंतर 370 कलम चा
मसुदा गोपालस्वामी अय्यंगार यांनी बनवला. हे अय्यंगार पूर्वी महाराजा हरिसिंग
यांचे दिवाण होते. परंतू त्यांना सुद्धा नंतर त्यांची चूक उमगली होती. कलम 370
रद्द केले हे बरेच झाले.जे पाकीस्तान,जे फुटीरतावादी काश्मीर
हे त्यांचे असल्याचा दावा करतात ते हे हेतूपुरस्सर विसरतात की
आजचे पाकीस्तान हा सुद्धा पूर्वी भारताचाच भाग होता.त्यामुळे काश्मीर हा भारताचाच अविभाज्य
भाग आहे. स्वतंत्रता प्राप्ती होऊन 70 वर्षे लोटली
काश्मीर आजही धगधगतच आहे. महाराजा हरिसिंग यांचे 1965 मध्ये मुंबई येथे निधन झाले.
तत्पूर्वीच बाबासाहेबांचे महापरीनिर्वाण झाले होते. बाबासाहेबांनी दूरदृष्टीने भविष्य
ओळखले होते. महाराजा हरिसिंग यांनी पाकिस्तानचा कावा ओळखला होता. परंतू काश्मीरचे
370 कलम आणि चीनच्या आक्रमणात “गवताचे पातेही उगवत नाही” म्हणून असा भूभाग चीनला देणे
अशा इतिहासावर परीणाम करणा-या कृती करणा-या नेहरूंनाच तो कसा काय ओळखता आला नाही देव
जाणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा