Click "Follow" Button below To Follow this Blog

२८/०१/२०२०

Jalees Ansari alias Dr Bomb brought to Mumbai, lodged at Arthur Road prison. Article on Ansari


 देशद्रोह्यांना हवे देहांत शासन
1993 Mumbai blasts convict Jalees Ansari
was arrested from Kanpur on Friday. (File photo)
CAA/NRC विरोध, शाहिनबाग बातम्यांच्या ओघात जलीस अन्सारीची बातमी झाकोळली गेली. मागील आठवडयात जलीस अन्सारी या 1993 मधील मुंबई साखळी  बॉम्बस्फोटात दोषी असलेल्या व पॅरोल वर मुक्त असलेल्या दहशतवाद्यास पळून जाण्याच्या बेतात असतांना उत्तरप्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने जेरेबंद केले. हा अन्सारी मुळचा मालेगावचा. एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण झाल्यावर हा अब्दुल करीम टुंडा च्या संपर्कात आला व बॉम्ब बनवणे शिकला. याच जलील अन्सारीने 1990 मध्ये दत्ता सामंत यांच्या परळ येथील कार्यालयात स्फोट घडवून आणला होता तद्नंतर मुंबई मध्ये अनेक ठिकाणी व 1993 मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोट, शिवसेना शाखा , चित्र सिनेमा हॉल , गुरुव्दारा अशाप्रकारे त्याने  52 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले. जास्तीत जास्त जिवितहानी व्हावी अशाच पद्धतीने त्याने हे बॉम्बस्फोट घडवले आहेत. हा अन्सारी उर्फ डॉ. बॉम्ब राजस्थान मधील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना त्याला 21 दिवसांचा पॅरोल मंजूर झाला. या पॅरोलची मुदत 17 जाने रोजी संपली. त्याआधीच तो फरार झाला. अजमेर दर्ग्यात हाजीर होण्याचे त्याने वचन दिले होते शिवाय दररोज ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश होते. पॅरोल संपण्यापूर्वीच उत्तरप्रदेश मधून नेपाळ मध्ये पळून जाण्याचा
त्याचा मनसुबा होता परंतू अन्सारी कानपूर येथील मुस्लिम वस्तीत असल्याची खबर उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथकास लागली व त्यांनी त्याला पकडले. या घटनेवरून तरी केंद्र व सर्व राज्य सरकारांनी कायद्यात मोठे बदल करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. देशद्रोही कृत्ये , भाषण करणा-यांना इतर देशात जशा शिक्षा होतात तशा शिक्षा आपल्या देशात का होत नाही ? आपल्या देशात कायदे तर कठोर नाहीच शिवाय शिक्षा देण्यात फार मोठा अवधी लागतो त्यामुळे गुन्हा करणा-यावर म्हणावा तसा जरब बसत नाही . कालच्या पुढील तीन घटना सुद्धा त्यातल्याच

     कालची ती शरजील इमामची आसाम तोडण्याची भाषा असलेली चित्रफित, आफरीन फातिमाची सुप्रीम कोर्ट व शासनावर विश्वास नसल्याचे सांगणारी चित्रफित व AMU च्या कुलगुरूंनी त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना हिंसा न करण्याचे आवाहन केले असता त्या विद्यार्थ्यांनी एकाच गदारोळ करून त्यांच्या भाषणातच हिंसाचार सुरु केला याची चित्रफित. शरजील जिंदाबादचे नारे. हे कशाचे निदर्शक आहे ? या देशात या देशद्रोही लोकांची एवढी हिम्मत कशी होते ? याचाच अर्थ कायद्याचा धाक नाही ? तेंव्हा सरकारने देशद्रोही कृत्ये करणा-यांना तात्काळ पॅरोल देण्याची तरतूद रद्द करावी जेणे करून पॅरोल वर असतांना डॉ. बॉम्ब सारख्यांना पळून जाता येणार नाही तसेच देशद्रोही कायदा अधिक कठोर करावा की इमाम , फातिमा सारख्यांना देश विरोधात काहीही बरळण्याची हिम्मत होणार नाही. देशद्रोह्यांना जरब बसविण्यासाठी व देशाची एकात्मता व अखंडता कायम राखण्यासाठी  देशद्रोह्यांना तात्काळ देहांत शासनच हवे.

२२/०१/२०२०

Article on a memory of a Dev Anand movie Guide Song, "Aaj Fir Jine Ki Tamanna Hai"

“आज फिर जीने की तमन्ना है” 
मै मराठी लेखक हूं |  यह मेरा पहला हिन्दी लेख है |
इस लेखमे  कुछ गलतीयां हुयी हो तो क्षमाप्रार्थी हूं |
उस दिन हम सब दोस्त चितौडगढ देखने हेतू खामगांव (महाराष्ट्र) से निकले | 19 जनवरी को महाराणा प्रतापजीके पुण्य स्मरण के दिन हमारा चितौड पहुचना यह हमने महाराणा प्रतापजी को हमारी औरसे श्रद्धांजली है ऐसा समझा | चितौड घुमते कई विरोंकी कहानीया याद आ रही थी ,अल्लाउद्दीन खिलजी के आक्रमणके समय महाराणी पद्मिनी और उनके संग कई स्त्रियों ने किये हुये जौहर (अग्नि समर्पण) की कहानी सुननेसे रौंगटे खडे हो जाते है | चितौड तो विरोंकी गाथा है | बप्पा रावल, राणा सांगा, रतनसिंह, महारानी पद्मिनी, संत मीरा बाई, महाराणा प्रताप आदी के बारे मे बताते हुये हमारा गाईड चेतन सालवी (गाईड सिनेेेमा के राजू गाईड जैसे) हमे ले जा रहा था | सबसे पहले तो वह हमे मीराबाई के मंदीर ले गया | मीराबाई, उनका भगवान कृष्णकेे  प्रती प्रेमभाव
"मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरो ना कोई |" 
ऐसा था| कृष्णके प्रती उनका बडा भक्तीभाव था |एक राजवंश की स्त्रीने कृष्णभक्ती मे लीन होकर घुमना यह मीराके ससुराल वालोको रास नही आया | उन्होने मीराको विषका प्याला दिया | लेकीन
"राणा ने विष दिया, मानो अमृत पिया    
मीरा गोविंद गोपाल गाने लगी ||" 
यह सब बाते, वैसेही राणाप्रताप का त्याग, उनका बलिदान, भिल्ल लोगोंके साथ रहना, मानसिंहसे हल्दीघाटीमे लडना, मानसिंह का राणा प्रताप ने  फेंके हुये भालेंसे बचना,  महाराणा के चहेते घोडे चेतक की मृत्यू, उनके भाई शक्तीसिंह, पुत्र अमरसिंह ऐसी कई बाते याद आ रही थी | राणा वंश, उनका गौरवशाली इतिहास, उनका त्याग, बलिदान महाराणा प्रताप का त्याग यह सब बाते, चितौड का प्रेरणादायी इतिहास मनमें घुम रहा था, हम विजयस्तंभ के करीब जा रहे थे | सामने दिखी दिवार कुछ जानी पहचानीसी लग रही थी | ऐसा लगा यह दिवार पहले भी कंही देखी है | तभी हमारे गाईडने हमे रोका और एक दिवार की तरफ निर्देश करते हुये कहा की यहाँ “आज फिर जीने की तमन्ना है” गानेमे वहीदा रहमानजी का नृत्य चित्रीत किया था | देव साब के गाईड फिल्म का वह गाना तुरंत याद आया| बर्मनदा, शैैैलेेंंद्रजी, लताजी ये सभी याद आये| देव साब और उनके गानो का फॅन होने के कारण उस जगह पोस्ट के साथ आपलोड की हुयी यह तसवीर खिंचने के लिये मै अपने आप को रोक नही पाया | अब हमारा लौटनेका वक्त समीप आ गया था|डूबते हुये सुरजके सामनेसे घोडे के आकारमे एक बादल दिखाई दे रहा था| ऐसा लग रहा था के जैसे चेतक दौड रहा हो|मनमें
 "सुरज के तेज जैसा चमके जिसका भाल, लालोमें लाल भारत माता का लाल , जीसने सुख को त्याग कर धर्म अपना मान कर , कर दिया बलिदान जीवन मातृभूमी के नाम पर " 
ऐसे परम पराक्रमी महाराणा, रजपूतोंके इतिहासकी तथा रतनसिंह, पन्ना दायी, महाराणी पद्मिनी, गोरा-बादल  आदी विरों की यांदे समेटे, रजपूतों का वह गौरवशाली इतिहास "फिरसे जीने की तमन्ना" लिये हम लौट रहे थे|



गाना 👇


१५/०१/२०२०

Article about spreading love in religion based on a old Hindi movie song "Pyar Bantate Chalo"


प्यार बाँटते चलो
द्यपरीस्थितीत देशाला शिस्त लावण्याचे प्रयत्न ,येथील सर्व व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी योग्य ते निर्णय घेतल्या जात असतांना. काही लोक मात्र स्वत:ची सत्तेत येण्याची वाट सुकर करण्यासाठी मुस्लिमांची माथी भडकवून देत आहेत. CAA नंतर “तुम्हाला या देशातून काढून टाकले जाणार” अशी भिती त्यांच्या डोक्यात घालून दिल्यावर झालेली हिंसक आंदोलने, तोडफोड, सार्वजनिक संपत्तीची नासधूस हे त्याचे द्योतक आहे. वास्तविक पाहता गेल्या कित्येक वर्षांपासून मुस्लिम भारतात राहत आहेत. फाळणीचे दू:ख पचवल्यावर व तद्नंतर झालेल्या काही दंगली, बॉम्बस्फोटानंतरही हिंदू व मुस्लिम जळवून घेतांना दिसून आले आहेत. अनेक हिंदू धार्मिक ठिकाणचा व्यवसाय हा मुस्लिम धर्मीय करतात व त्यांचा ग्राहक वर्ग हा हिंदू असतो. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील . सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा म्हणाले आहेत की “मुस्लिमांना सोबत घेऊन चालावे लागेल.” तरीही राहुल गांधी संघाच्या नावाने बोटे मोडत असतात. राजकारणात संघाला घुसवत असतात.देश आता कात टाकून अधिक बलशाली , अधिक नवीन रूपात प्रकट होण्याच्या मार्गावर आहे. मुस्लिमांनी हे समजून घेणे जरूरी आहे. कुणी काही सांगितल्यावर उगाच माथी भडकवून घेऊन स्वत:चे व देशाचे नुकसान करू नये. संसदेत मंजूर झालेला कायदा , संविधान व त्यातील बाबी हे समजून घेऊन मग सनदशीर मार्गाने आंदोलने करावी , सरकारकडे मागण्या कराव्या तसा सर्वांनाच अधिकार आहे. या देशात आपण सर्व गुण्या-गोविंदाने राहत आलेलो आहोत. हा देश जेवढा राम-कृष्णाचा आहे तेवढा कबीर , साईबाबा , रहीम , गौतम बुद्ध यांचा सुद्धा आहे. यांनी सर्वांनी प्रेमाचा संदेश दिलेला आहे. याप्रसंगी किशोर कुमारने गायलेले एक जुने चित्रपट गीत व त्यातील काही ओळी प्रकर्षाने स्मरतात.असद भोपाली यांनी रचलेले व लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले   हे गीत आजच्या परीस्थितीत सुद्धा चपखल लागू होते. हे गीत किशोरकुमारच्या आवाजाने पाहण्यास व ऐकण्यास आजही तितकेच टवटवीत आहे जितके पूर्वी होते 
प्यार बाँटते चलो, प्यार बाँटते चलो
क्या हिन्दू क्या मुसलमाँ हम सब हैं भाई-भाई
 राम ये है तो रहमान तुम हो , ये है कर्तार तो जॉन तुम हो
नाम कुछ हो मगर ये ना भूलो,  सबसे पहले तो इन्सान तुम हो
मानवतेचा संदेश क अशी आणखी कित्येक गाणी आहेत. कबीराचे , रहीमचे दोहे आहेत जी दररोज सकाळी भारतात अनेक ठिकाणी लावली जातात , ऐकली जातात. परंतू मध्येच एखाद्या मुद्द्यावर धूर्त
राजकारणी जातीय , धार्मिक तेढ समाजात निर्माण करून स्वत:च्या सत्तेकडे नेणा-या वाटा धांडोळत असतात. सुज्ञ मुस्लिम , हिंदू व अन्य धर्मियांनी या धूर्त राजकारण्यांना ओळखणे जरूरी आहे. हे नेते स्वत:ची , स्वत:च्या पक्षाची विचारसारणी वळकटीला बांधून कालपर्यन्त ज्यांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या त्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसण्यास कचरत नाही. ज्या जनतेच्या पुढे मतांची झोळी पसरवतात त्यांनाच एकमेकांशी लढवतात. तेंव्हा या अशा नेत्यांना , राजकारण्यांना ओळखून गरीब जनतेने , हातमजूरीवर उदरनिर्वाह करणा-यांनी यांच्या नादी न लागता नवीन पिढीसाठी एक आदर्श भारत निर्माण करण्यासाठी हातभार लावावा व “क्या हिन्दू क्या मुसलमाँ हम सब हैं भाई-भाईहे ध्यानात घेऊन “प्यार बाँटते चलो” करत कबीर , रहीम, साईबाबा यांनी सांगितलेल्या प्रेम भावाने राहावे. कारण
प्यार है ज़िन्दगी की निशानी, यह बुजुर्गो का कहना है यारो
एक ही साज के तार हैं सब, हमको मिल जुल के रहना है यारो
सोचो कल क्या थे, देखो अब क्या हो
तुमको ले ना डूबे, कही अपनी यह लड़ाई |

०९/०१/२०२०

Article about JNUs 50 years and various protests

JNU ची 50 वर्षे 
सध्या भारतात एक नाव विशेष म्हणजे एका शैक्षणिक संस्थेचे नाव सतत चर्चेत आहे. “भारत तेरे तुकडे होंगे” , “लेकर रहेंगे आझादी” अशा ना-यांचा आधारे या संस्थेचा कन्हैय्या कुमार नामक विद्यार्थ्याचा सुद्धा राजकीय पटलावर उदय झाला. ती शैक्षणिक संस्था म्हणजे “जे एन यु” अर्थात जवाहरलाल नेहरु युनिव्हरसिटी. परवा या ठिकाणी विद्यार्थ्यांवर कुण्या बुरखाधारी युवकांनी हल्ला केला. भारतीय संसदेने मंजूर केलेला नागरिकता संशोधन कायदा अर्थात CAA या कायद्याच्या विरोधात या विद्यापीठाचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. समाजवाद, सेक्युलॅरीझमच्या नावाआड येथे सतत राष्ट्रविरोधी नारे, आंदोलने सुरु असतात. या आंदोलनांना मोठा इतिहास सुद्धा आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आशेने शिक्षणासाठी म्हणून पाठवले असते असे येथील काही विद्यार्थी स्वत:चा अभ्यास, करीअर याकडे पूर्णत: लक्ष देण्याऐवजी राजकीय बाबींकडेच अधिक लक्ष देत असतात. ते कुणाच्या हातातील बाहुले बनले आहेत, त्यांना कुठून फंडिंग होते हे प्रकाशझोतात येणे अत्यंत गरजेचे

झाले आहे. जवाहरलाल नेहरू युनिव्हरसिटीचे विधेयक मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिलेले व 1965 मध्ये शिक्षण मंत्री असलेल्या एम. सी. छागला यांनी लोकसभेत मांडले. लोकसभेने 1966 या वर्षी बील मंजूर केले व 1969 या वर्षी कायदा संमत करून JNU स्थापन झाले. JNU विधेयक सादर करणारे हे छागला महोदय जिनांचे अनुयायी व मुस्लिम लीगचे सदस्य होते, यांनी जिनांच्या हाताखाली 7 वर्षे पर्यंत कार्य केले होते. पाकिस्तानची मागणी करणा-या जिनांच्या हाताखाली कार्य करणा-या छागलांनी नंतर स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन केला होता. डॉ आंबेडकर यांच्या सोबत कार्य केल्यानंतर व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाल्यावर त्यांनी भारतीय स्वतंत्रता आंदोलनाला सहकार्य केले. परंतू पूर्वी जिनांची विचारसरणी मानणा-या छागला यांनी JNU विधेयक मांडले यात बरेच काही स्पष्ट होते. 1969 मध्ये स्थापना  झालेले JNU आता 50 वर्षाचे झाले. एखाद्या मनुष्याने जर वयाची चाळीशी पार केली की त्याच्यामध्ये, त्याच्या विचारामध्ये एक प्रगल्भता येते, maturity येते आणि त्याची इतरजणांशी जी वागणूक असते त्यामध्ये मोठा बदल आपसूकच होत असतो. परंतू JNU ही एक शैक्षणिक संस्था आहे. जरी शैक्षणिक संस्था असली तरी ती देशातील इतर विद्यापीठाप्रमाणे प्रगल्भ झालेली का दिसत नाही? या व यासम इतर AMU,JMU सारख्या विद्यापीठातच फुटीरतावादी विचार कसे रोवले जात आहेत? JNU या शैक्षणिक संस्थेतून अनेक चांगले, देशाभिमानी नागरिक तयार झाले आहेत परंतू त्यांच्या स्टोरी माध्यमे दाखवत नाही. JNU शी संलग्नीत असलेल्या NDA या संरक्षण प्रबोधिनी मधून सुद्धा अनेक देशप्रेमी , देशासाठी सर्वस्व त्याग करणारे सैन्याधिकारी निर्माण झाले आहेत परंतू त्यांच्यावर सुद्धा प्रकाशझोत टाकला जात नाही. दाखवली जातात फक्त या डाव्यांचा प्रभाव असलेल्या विद्यार्थ्यांची आंदोलने. सतत त्यांचा भडीमार दुरचित्रवृत्तवाहिन्यांवर असतो व त्यामुळे या तथाकथित , वयाने फार मोठ्या असलेल्या विद्यार्थ्यांना अधिकच चेव येतो. वास्तविक पाहता हे विद्यार्थी,फिल्मवाले, पुरस्कार वापसीवाले, आहेत तरी किती? उणेपुरे 5 टक्केही नसतील.परंतू यांना वारंवार दाखवून भारत अस्थिर असल्याचे चित्र आपल्याच वृत्त वाहिन्या का दाखवतात? आपलीच माध्यमे अशी आहेत म्हणून न्युयॉर्क,लंडन येथील माध्यमे सुद्धा आपल्या देशाची प्रतिमा खराब होईल अशी वृत्ते छापतात. डाव्यांच्या विचाराने प्रभावीत असलेले JNU सतत वादात असते. सन 2000 मध्ये इंडो-पाक मुशायरा च्या वेळी झालेला वाद, सर्वोच्च न्यायालयाने सन 2008 मध्ये येथील निवडणुकांवर स्थगिती दिली होती, 2010 मध्ये दांतेवाडा येथे नक्षल्यांनी CRPF जवानांना मारल्यावर AISA या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला होता. 2018 मध्ये JNU च्या 100 मीटर परिसरात
आंदोलन करता येणार नाही असा दिल्ली उच्च न्यायालयाने आदेश दिला होता. हे  असे कितीतरी दाखले देता येतील. परवा JNU मध्ये बुरखे घालून झालेला हल्ला, दीपिका पदुकोणची मूक हजेरी. हे प्रकार व त्यामुळे वाद हे येथे सुरूच असते. JNU ला आता 50 वर्षे झाली आहेत. विद्यार्थ्यांनी प्रथम त्यांच्या अभ्यासाकडे , त्यांच्या ध्येयपुर्तीकडे वाटचाल करायला हवी. कन्हैय्या सारख्या तसेच कश्यप, भारव्दाज, अख्तर, दीपिका या असल्या फिल्मी, प्रसिद्धी पिपासू, तथाकथित बुद्धीवादी, शत्रू धार्जिण्या लोकांपासून दूर राहून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी,आपली पदवी,पदव्युत्तर शिक्षण ,आचार्य पदवी पूर्ण करून त्याचा उपयोग देशसेवेसाठी करावा हे विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांना, शिक्षकांना, देशाला अपेक्षित आहे.भारताची ओळख जगाला करून देणा-या स्वामी विवेकानंद यांच्या देशात आपण राहतो हे ध्यानात ठेऊन JNU व भारतातील सर्वच शिक्षण संस्थांंनी राजकारण बाजूला सारून त्यांच्या संस्थांमधून स्वामी विवेकानंद यांचे “Man Making Education” अर्थात मनुष्य निर्माण करणारे शिक्षण कसे देता येईल यावर लक्ष केंद्रित करायला हवे.तसेच JNU प्रशासनाने सुद्धा 50 वर्षपूर्तीच्या अनुषंगाने सारासार विचार करून संस्था राजकारणापासून कशी दूर राहील यावर चिंतन करावे.

०४/०१/२०२०

Congress' Seva Dal sparks row by distributing controversial booklets on Savarkar, article elaborate this

.तुझ्या परी नावांचा रे अजूनी दरारा 
एखादा व्यक्ती जन्माला येतो. सर्वसामान्य कुटुंबात वाढतो. परंतू आपल्या असामान्य उपजत बुद्धी, गुण संपदेने असे काही कर्तुत्व गाजवतो की त्याला विश्वात तोड उरत नाही. अवघे विश्वच त्याची प्रतिभा, त्याचे कर्तुत्व , त्याचे राष्ट्रप्रेम, त्याची निष्ठा, संघठन कौशल्य ,तळागाळातील जनतेसोबत राहून त्यांच्या उद्धारासाठी झोकून देऊन केलेले कार्य, त्याने रचलेले काव्य , लिहिलेले साहित्य याला मान्यता देते. असे अनेक महापुरुष या भारत भूमीत जन्मले. नावेच घ्यायची म्हटली तर काही पाने नावे लिहिण्यातच खर्ची होतील.अशा व्यक्तीस मग त्याच्या बाबत अपमानास्पद वक्तव्ये करून, लिखाण करून त्याची महत्ता कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो, त्याची विचारसारणी आपल्या राजकारणाच्या आड येते म्हणून मग आणखी करणार तरी काय ? कारण त्यांच्यासारखी प्रतिभा , बौद्धिक पातळी यांच्याकडे नाही. म्हणून मग त्यांची जितकी अवहेलना करता येईल, जितका अपमान करता येईल तेवढा त्याच्या मरणोपरांत सुद्धा केल्या जातो. असेच एक व्यक्ती म्हणजे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकर यांनी केलेले कार्य , त्यांची दूरदृष्टी , हिंदू व हिंदूंवर भविष्यात येणारी संकटे , चीनचा धोका , युवकांना सैन्यात भरती होण्याचा सल्ला अशा आणखी  कितीतरी गोष्टी सावरकरांबाबत सांगता येतील. सावरकर त्यांचे बंधू त्यांची पत्नी , वाहिनी सर्व कुटुंबानी देशासाठी सर्वस्व अर्पिले. अशा सावरकरांचा पदोपदी अपमान कॉग्रेस पक्ष व कॉंग्रेसजन करीत असतात. मणिशंकर अय्यर, वाचाळवीर राहुल गांधी आणि आता कॉंग्रेस सेवादल.विशिष्ट अशा समूहाचे लांगूलचालन करून त्यांची मते मिळवून त्यावर स्वत:च्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी हा पक्ष व त्यातील नेते हे असले उपद्व्याप करीत असतात. स्वातंत्र्य संग्रामात सामील असल्याचे तुणतुणे कॉंग्रेस पक्ष सतत वाजवीत असतो, तसे त्यांचे नेहमीच टुमणे असते.तुमच्या मुळे स्वातंत्र्य मिळाले तर त्याच स्वतंत्रता संग्रामात अग्रणी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तुम्हाला 70 वर्षा नंतरही एवढा धसका का ? काल मध्यप्रदेशातील वैरागढ , भोपाळ येथे कॉंग्रेस सेवादलाच्या अखिल भारतीय प्रशिक्षणात “'आरएसएस और बीजेपी, कुछ तथ्य
और जानकारी' आणि वीर सावरकर कितने वीर ?’ ही पुस्तके वितरीत करण्यात आली. यातील एका पुस्तकात सावरकर यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. ही टीका इतकी खालच्या स्तरावरची आहे की त्या टीकेचा पुनरुच्चार सुद्धा करावा वाटत नाही. कॉंग्रेसला असे पुस्तक वितरीत करतांना नाही जनाची निदान मनाची तर शरम वाटायला हवी. आपल्याच देशातील थोर नेत्यावर अशी टीका करण्याच्या या प्रकारामुळे कॉंग्रेसची
देशातच नव्हे तर जगात नाचक्की 

होत आहे. याउपरही पुस्तिकेतील माहिती

ही लेखकाने पुराव्यांच्या आधारे  लिहिली असल्याचा दावा काँग्रेसचे नेते लालजी देसाई यांनी केला आहे. या अशा  प्रकारामुळे भविष्यात कॉंग्रेस आणखी रसातळाला जाणार हे निश्चित. यांना स्वातंत्र्य प्राप्तीस 70 वर्षे उलटूनही जळी , स्थळी , काष्ठी, पाषाणी सावरकरच दिसतात. सेवादलाच्या प्रशिक्षण शिबीरात कॉंग्रेसने खरे तर त्यांच्या प्रशिक्षणार्थ्यांना सकारात्मक , सेवादलाच्या अनुषंगाने राष्ट्रसेवा , देशाच्या समस्या, कॉंग्रेसच्या माध्यमातून देशसेवा हे धडे देणे अपेक्षित आहे. तसे पाठ देण्याऐवजी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , सावरकर यांच्या विषयी व्देषभावना पसरवणारे पुस्तक वितरीत करीत आहेत यावरून त्यांची नैतीकता,  वैचारीक पातळी, राजकारणाचा स्तर या बाबी जनतेच्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही. सावरकरांनी देशासाठी जे काही केले , ज्या यातना भोगल्या तशा यातना या असली टीका करणा-यांना जर दिल्या तर त्या यांना झेपतील का ? सावरकर त्यांचे कुटुंबीय यांच्याबाबत यांनी काही वाचले तरी आहे का ? यांच्याच इंदीरा गांधींनी सावरकरांची स्तुती केली होती, डाक तिकीट काढले होते हे सुद्धा हे विसरले का ? सावरकर यांचा नावाचा दरारा एवढा होता की इंग्रजांना सुद्धा त्यांची भीती वाटे. म्हणूनच अंदमानातून सुटका केल्यावर सावरकर पुन्हा राजकीय कारवाया करतील म्हणून इंग्रजांनी त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध केले होते. लैंगीकता , अनैसर्गिक कृत्ये ही पाश्च्यात्यांची, इटलीची संस्कृती , आणि म्हणूनच कदाचित यांना सर्वत्र तसेच दिसते. कुठल्या तरी तद्दन , भिकारचोट इतिहासकारचा कदाचित ते दाखलाही देतील परंतू एवढे मात्र खरे की सावरकर जाऊन इतकी वर्षे लोटली तरीही त्यांच्या नावाचा  दरारा आजही कायम आहे. आणि याच दरा-यामुळे ही असली अश्लाघ्य टीका केली जाते. परंतू यांच्या या अशा कृत्यांमुळे लोक मोठया प्रमाणात सावरकर साहित्य वाचू लागले आहे व लोकांना सावरकर अधिक चांगल्याप्रकारे कळत आहेत.

०२/०१/२०२०

Article on the Maharashtra cabinet expansion and disappointed Shivsena MLAs

नाराज मावळ्यांचा मुख्यमंत्री 

   शिवसेना नेहमीच शिवाजी महाराजांची महती सांगत असते. शिवाजी महाराज म्हणजे शिवसेनेंचे आदर्श. त्या अनुषंगाने मग शिवसेनेची भाषा , वागणूक सुद्धा तशीच असते. बाळासाहेबांचे सिंहासन , मातोश्री हा शब्द हे त्याचे दाखले देता येतील .आणखी असे बरेच काही शिवसेनेमध्ये व त्यांच्या नेत्यांचा वागणूकीतून दिसून येत असते. त्याअर्थी शिवसेनेचे आमदार म्हणजे शिवसेनेचे मावळेच म्हणता येतील. उद्धव ठाकरे टोकाची विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांशी बाळासाहेबांना दिलेल्या शब्दासाठी राजकीय निवडणुकीत्तोर युती करूनस्वत: मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले व ज्या घराणेशाहीवर बाळासाहेबांनी नेहमीच टीका केली ते विसरून आपल्या पुत्रास सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद दिले. आदित्यला दिलेले कॅबिनेट मंत्रीपद , शिवसेनेचे सर्वाधिक आमदार असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षास दिलेली मंत्रीपदांची संख्या ही शिवसेनेच्या मंत्रीपदांपेक्षा अधिक आहे. यांमुळे शिवसेनेत नाराजी पसरलेली आहे. इतर पक्षांत सुद्धा खात्यांवरून नाराजी आहेच. सदैव तो-यात वावरणारे “हेडमास्तर” संजय राऊत भावाला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराज आहे. भास्कर जाधव, रामदास कदम, प्रताप सरनाईक , संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्याने भावना गवळी, वरिष्ठ नेते दिवाकर रावते , सुनील राऊत, दीपक केसरकर असे अनेक मावळे नाराज आहेत. हे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांना आता भेटतीलच तेंव्हा उद्धव यांना या नाराज
मावळ्यांची समजूत काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. तिकडे काँग्रेस चे “आदर्श” नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व मंत्रीपदी वर्णी लागलेले सर्व दिल्लीच्या “मातोश्री” कडे खातेवाटपाबाबत भेटून आले. दिल्लीच्या मातोश्रींनी “बाबांना” थांबण्यास सांगितले आहे. माजी मुख्यमंत्र्यांना आता उद्धव यांच्या नेतृत्वाखाली कार्य करावे लागणार आहे. तीन-तीन दिवस बैठका होऊनही खातेपावाटप होऊ शकलेले नाही. काँग्रेस नेते महत्वाच्या खात्यांबाबत आग्रही असल्याने तुटेपर्यंत ताणू नका असा सल्ला अजित पवार यांनी त्यांना दिला आहे. अनिल देशमुख यांच्याकडे गृह खाते देण्यास त्यांच्याच पक्षातील वरिष्ठांचा विरोध आहे. सुनील राऊत यांच्या बांधकाम खात्यावर सुद्धा काही टपून बसले आहेत. अशी नाराज, असंतुष्टांची यादी वाढतीच आहे. तरुंगातून वापसी झालेले व सध्या प्रकृती एकदम ठणठणीत असलेले छगन भुजबळ कोणतेही खाते मिळाले तरी चालेल असे म्हणत आहेत. पण काही ना काही हवेच ही त्यांची वृत्ती त्यांच्या मागणीतून दिसून येत आहे. जनतेच्या मनातील नसलेले व सत्तेसाठी विचारसरणी दूर सारलेल्या पक्षांचे हे अभद्र आघाडीचे सरकार कसेतरी दिवस काढणार आहे असे स्वत: जयंत पाटील म्हणतात. पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की “असेच थोडे-थोडे दिवस पूर्ण करून आम्ही पाच वर्ष पूर्ण करू”. पाटील साहेब याचा अर्थ तुमचे सरकार हे दिवस काढू सरकार असणार. तुमच्या कार्यकाळात राज्याचा विकास वेग धरेल अशी अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. मोदी सरकारला “अफझल खानाची फौज” असे म्हणणारे उद्धव ठाकरे शिवसेनेची, बाळासाहेबांची सर्व जुनी तत्वे बासनात गुंडाळून मातोश्री वरील माळोच्यावर ठेऊन आता वर्षावर दाखल झाले आहे. त्यांना दंगेखोरांना रोखण्यासाठी केलेली कारवाई जालियानवाला बाग हत्याकांडासारखी वाटते, याकुब मेमनची फाशी रोखावी यासाठी  केलेल्या अर्जावर सही करणारे अस्लम शेख यांना ते मंत्री मंडळात घेतात , पूर्वी बाळासाहेबांना अटक करण्यास सरसावलेल्या नेत्यास सुद्धा त्यांनी मंत्री मंडळात घेतले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेत नाराजी आहे आणि उद्धव ठाकरे या शिवसनेसाठी झटलेल्या , शिवसेना वाढविलेल्या शिवसैनिकांना , शिवसेनेच्या या मावळ्यांना दूर सारून नाराज मावळ्यांचे मुख्यमंत्री बनले आहेत. आपल्या मावळ्यांना नाराज करून याकुब मेमनच्या पाठीराख्यास मंत्रीपद देणारा असा शिवसैनिक मुख्यमंत्री हा बाळासाहेबांना कदापी आवडला नसता.