प्यार
बाँटते चलो
सद्यपरीस्थितीत
देशाला शिस्त लावण्याचे प्रयत्न ,येथील सर्व व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी योग्य ते निर्णय घेतल्या जात असतांना. काही लोक मात्र स्वत:ची सत्तेत येण्याची वाट
सुकर करण्यासाठी मुस्लिमांची माथी भडकवून देत आहेत. CAA नंतर
“तुम्हाला या देशातून काढून टाकले जाणार” अशी भिती त्यांच्या डोक्यात घालून
दिल्यावर झालेली हिंसक आंदोलने, तोडफोड, सार्वजनिक संपत्तीची नासधूस हे त्याचे द्योतक आहे. वास्तविक पाहता गेल्या
कित्येक वर्षांपासून मुस्लिम भारतात राहत आहेत. फाळणीचे दू:ख पचवल्यावर व तद्नंतर
झालेल्या काही दंगली, बॉम्बस्फोटानंतरही हिंदू व मुस्लिम
जळवून घेतांना दिसून आले आहेत. अनेक हिंदू धार्मिक ठिकाणचा व्यवसाय हा मुस्लिम धर्मीय
करतात व त्यांचा ग्राहक वर्ग हा हिंदू असतो. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील . सरसंघचालक
मोहन भागवत हे सुद्धा म्हणाले आहेत की “मुस्लिमांना सोबत घेऊन चालावे लागेल.” तरीही
राहुल गांधी संघाच्या नावाने बोटे मोडत असतात. राजकारणात संघाला घुसवत असतात.देश आता
कात टाकून अधिक बलशाली , अधिक नवीन रूपात प्रकट होण्याच्या मार्गावर
आहे. मुस्लिमांनी हे समजून घेणे जरूरी आहे. कुणी काही सांगितल्यावर उगाच माथी भडकवून
घेऊन स्वत:चे व देशाचे नुकसान करू नये. संसदेत मंजूर झालेला कायदा , संविधान व त्यातील बाबी हे समजून घेऊन मग सनदशीर मार्गाने आंदोलने करावी , सरकारकडे मागण्या कराव्या तसा सर्वांनाच अधिकार आहे. या देशात आपण सर्व गुण्या-गोविंदाने
राहत आलेलो आहोत. हा देश जेवढा राम-कृष्णाचा आहे तेवढा कबीर , साईबाबा , रहीम , गौतम बुद्ध यांचा
सुद्धा आहे. यांनी सर्वांनी प्रेमाचा संदेश दिलेला आहे. याप्रसंगी किशोर कुमारने गायलेले
एक जुने चित्रपट गीत व त्यातील काही ओळी प्रकर्षाने स्मरतात.
प्यार बाँटते चलो, प्यार बाँटते चलो
क्या हिन्दू क्या मुसलमाँ हम सब हैं भाई-भाई
क्या हिन्दू क्या मुसलमाँ हम सब हैं भाई-भाई
राम ये है तो रहमान तुम हो , ये है कर्तार तो जॉन तुम हो
नाम कुछ हो मगर ये ना भूलो, सबसे पहले तो इन्सान तुम हो
नाम कुछ हो मगर ये ना भूलो, सबसे पहले तो इन्सान तुम हो
मानवतेचा
संदेश क अशी आणखी कित्येक गाणी आहेत. कबीराचे , रहीमचे दोहे आहेत जी दररोज सकाळी भारतात अनेक ठिकाणी लावली जातात , ऐकली जातात. परंतू मध्येच एखाद्या मुद्द्यावर धूर्त
राजकारणी जातीय , धार्मिक तेढ समाजात निर्माण करून स्वत:च्या सत्तेकडे नेणा-या वाटा धांडोळत असतात. सुज्ञ मुस्लिम , हिंदू व अन्य धर्मियांनी या धूर्त राजकारण्यांना ओळखणे जरूरी आहे. हे नेते स्वत:ची , स्वत:च्या पक्षाची विचारसारणी
वळकटीला बांधून कालपर्यन्त ज्यांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या त्यांच्या मांडीला
मांडी लाऊन बसण्यास कचरत नाही. ज्या जनतेच्या पुढे मतांची झोळी पसरवतात त्यांनाच एकमेकांशी
लढवतात. तेंव्हा या अशा नेत्यांना , राजकारण्यांना ओळखून गरीब
जनतेने , हातमजूरीवर उदरनिर्वाह करणा-यांनी यांच्या नादी न लागता
नवीन पिढीसाठी एक आदर्श भारत निर्माण करण्यासाठी हातभार लावावा व “क्या हिन्दू क्या मुसलमाँ हम सब हैं भाई-भाई” हे ध्यानात घेऊन “प्यार बाँटते चलो” करत कबीर
, रहीम, साईबाबा यांनी सांगितलेल्या
प्रेम भावाने राहावे. कारण
प्यार है ज़िन्दगी की निशानी, यह बुजुर्गो का कहना है यारो
एक ही साज के तार हैं सब, हमको मिल जुल के रहना है यारो
सोचो कल क्या थे, देखो अब क्या हो
तुमको ले ना डूबे, कही अपनी यह लड़ाई |
एक ही साज के तार हैं सब, हमको मिल जुल के रहना है यारो
सोचो कल क्या थे, देखो अब क्या हो
तुमको ले ना डूबे, कही अपनी यह लड़ाई |

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा