.तुझ्या
परी नावांचा रे अजूनी दरारा
एखादा व्यक्ती जन्माला येतो. सर्वसामान्य
कुटुंबात वाढतो. परंतू आपल्या असामान्य उपजत बुद्धी, गुण संपदेने असे काही कर्तुत्व गाजवतो की त्याला विश्वात तोड उरत नाही. अवघे विश्वच
त्याची प्रतिभा, त्याचे कर्तुत्व ,
त्याचे राष्ट्रप्रेम, त्याची निष्ठा,
संघठन कौशल्य ,तळागाळातील जनतेसोबत राहून त्यांच्या
उद्धारासाठी झोकून देऊन केलेले कार्य, त्याने रचलेले काव्य , लिहिलेले साहित्य याला मान्यता देते. असे अनेक महापुरुष या भारत भूमीत
जन्मले. नावेच घ्यायची म्हटली तर काही पाने नावे लिहिण्यातच खर्ची होतील.अशा
व्यक्तीस मग त्याच्या बाबत अपमानास्पद वक्तव्ये करून, लिखाण
करून त्याची महत्ता कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो, त्याची विचारसारणी आपल्या राजकारणाच्या आड येते म्हणून मग आणखी करणार तरी काय ? कारण त्यांच्यासारखी प्रतिभा , बौद्धिक
पातळी यांच्याकडे नाही. म्हणून मग त्यांची जितकी अवहेलना करता येईल, जितका अपमान करता येईल तेवढा त्याच्या मरणोपरांत सुद्धा केल्या जातो.
असेच एक व्यक्ती म्हणजे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
सावरकर यांनी केलेले कार्य , त्यांची दूरदृष्टी , हिंदू व हिंदूंवर भविष्यात येणारी संकटे , चीनचा
धोका , युवकांना सैन्यात भरती होण्याचा सल्ला अशा आणखी कितीतरी गोष्टी सावरकरांबाबत सांगता येतील.
सावरकर त्यांचे बंधू त्यांची पत्नी , वाहिनी सर्व कुटुंबानी
देशासाठी सर्वस्व अर्पिले. अशा सावरकरांचा पदोपदी अपमान कॉग्रेस पक्ष व कॉंग्रेसजन
करीत असतात. मणिशंकर अय्यर, वाचाळवीर राहुल गांधी आणि आता कॉंग्रेस
सेवादल.विशिष्ट अशा समूहाचे लांगूलचालन करून त्यांची मते मिळवून त्यावर स्वत:च्या
राजकीय पोळ्या शेकण्यासाठी हा पक्ष व त्यातील नेते हे असले उपद्व्याप करीत असतात.
स्वातंत्र्य संग्रामात सामील असल्याचे तुणतुणे कॉंग्रेस पक्ष सतत वाजवीत असतो, तसे त्यांचे नेहमीच टुमणे असते.तुमच्या मुळे स्वातंत्र्य मिळाले तर त्याच
स्वतंत्रता संग्रामात अग्रणी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तुम्हाला 70
वर्षा नंतरही एवढा धसका का ? काल मध्यप्रदेशातील वैरागढ , भोपाळ येथे कॉंग्रेस सेवादलाच्या अखिल भारतीय प्रशिक्षणात “'आरएसएस और बीजेपी, कुछ तथ्य
और जानकारी' आणि ‘वीर सावरकर कितने वीर ?’
ही पुस्तके वितरीत करण्यात आली. यातील एका पुस्तकात सावरकर यांच्यावर अतिशय
खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. ही टीका इतकी खालच्या स्तरावरची आहे की
त्या टीकेचा पुनरुच्चार सुद्धा करावा वाटत नाही. कॉंग्रेसला असे पुस्तक वितरीत
करतांना नाही जनाची निदान मनाची तर शरम वाटायला हवी. आपल्याच देशातील थोर नेत्यावर
अशी टीका करण्याच्या या प्रकारामुळे कॉंग्रेसची
देशातच नव्हे तर जगात नाचक्की
होत आहे. याउपरही पुस्तिकेतील माहिती
ही लेखकाने पुराव्यांच्या आधारे लिहिली असल्याचा दावा काँग्रेसचे नेते लालजी देसाई यांनी केला आहे. या अशा प्रकारामुळे
भविष्यात कॉंग्रेस आणखी रसातळाला जाणार हे निश्चित. यांना स्वातंत्र्य प्राप्तीस
70 वर्षे उलटूनही जळी , स्थळी , काष्ठी,
पाषाणी सावरकरच दिसतात. सेवादलाच्या प्रशिक्षण शिबीरात कॉंग्रेसने खरे तर
त्यांच्या प्रशिक्षणार्थ्यांना सकारात्मक ,
सेवादलाच्या अनुषंगाने राष्ट्रसेवा , देशाच्या समस्या, कॉंग्रेसच्या माध्यमातून देशसेवा हे धडे देणे अपेक्षित आहे. तसे पाठ देण्याऐवजी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , सावरकर
यांच्या विषयी व्देषभावना पसरवणारे पुस्तक वितरीत करीत आहेत यावरून त्यांची
नैतीकता, वैचारीक
पातळी, राजकारणाचा स्तर या बाबी जनतेच्या लक्षात आल्यावाचून राहणार
नाही. सावरकरांनी देशासाठी जे काही केले , ज्या यातना भोगल्या तशा यातना या असली टीका करणा-यांना जर दिल्या तर त्या यांना झेपतील का ? सावरकर त्यांचे कुटुंबीय यांच्याबाबत यांनी काही वाचले तरी आहे का ? यांच्याच इंदीरा गांधींनी सावरकरांची स्तुती केली होती, डाक तिकीट काढले होते हे सुद्धा हे विसरले का ?
सावरकर यांचा नावाचा दरारा एवढा होता की इंग्रजांना सुद्धा त्यांची भीती वाटे. म्हणूनच
अंदमानातून सुटका केल्यावर सावरकर पुन्हा राजकीय कारवाया करतील म्हणून इंग्रजांनी त्यांना
रत्नागिरी येथे स्थानबद्ध केले होते. लैंगीकता , अनैसर्गिक कृत्ये
ही पाश्च्यात्यांची, इटलीची संस्कृती ,
आणि म्हणूनच कदाचित यांना सर्वत्र तसेच दिसते. कुठल्या तरी तद्दन , भिकारचोट इतिहासकारचा कदाचित ते दाखलाही देतील परंतू एवढे मात्र खरे की सावरकर
जाऊन इतकी वर्षे लोटली तरीही त्यांच्या नावाचा दरारा आजही कायम आहे. आणि याच दरा-यामुळे ही असली
अश्लाघ्य टीका केली जाते. परंतू यांच्या या अशा कृत्यांमुळे लोक मोठया प्रमाणात सावरकर
साहित्य वाचू लागले आहे व लोकांना सावरकर अधिक चांगल्याप्रकारे कळत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा