आता खमके व्हावे लागेलच
1920 लोकमान्य
टिळकांच्या निधनानंतर इंग्रजविरोधी लढ्याच्या पटलावर महात्मा गांधींचा उदय झाला आणि राष्ट्रीय
असंतोषाच्या जहाल आंदोलनांऐवजी स्वातंत्र्यासाठी शांतता , अहिंसा या मार्गाने इंग्रज
विरोधी निदर्शने सुरु झाली मग
“क्षुद्रं
हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप:”
अर्थात
अंत:करणाचे असे
क्षुद्र दुबळेपण सोडून हे परंतप (अर्जुन) ऊठ आणि युद्ध कर. अशी शिकवण गीतेतून अर्जुनाला देणा-या श्रीकृष्णाच्या
या देशातील तत्कालीन नेते शांत, मिळमिळीत
झाले. शांतता-अलिप्तता करीत त्यांनी केलेल्या अनेक करारांमुळे आज POJK , अक्साई
चीन ही परिस्थिती उद्भवली आहे. ती निस्तारण्याचे कशोशीचे प्रयत्न 370 कलाम रद्द
करून , लडाखला केंद्रशासित करून , BRO च्या माध्यमातून सीमेलगत विकास करून, हेलीपॅड
, विमानतळे तयार करून विद्यमान सरकार करीत आहेच. शांतता, अहिंसा , अलिप्तता हे
धोरण साफ चुकीचेच होते हे सिद्ध करण्याचा मुळीच उद्देश नाही परंतू “अति सर्वत्र
वर्ज्यते” हे सुद्धा तितकेच खरे आहे. आपल्या या शांततेच्या मार्गाचा
स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा अतिरेक झाला. आपण कधी आक्रमक नव्हतो हे मान्य परंतू
आपल्या शांततेच्या अतिरेकाने कुणीही येऊन आपल्याला टक्कर देणे सुरु केले. म्हणूनच
मग स्वतंत्र झाल्याबरोबरच पाकीस्तानातून टोळ्यांनी आक्रमण केले, 1947, 1965, 1971,
1999 अशी चार वेळा कस्पटाप्रमाणे असणा-या पाकड्यांनी आपल्यावर आक्रमणे केली.
अतिरेकी हल्ले तर सुरूच आहेत. विस्तारवादी चीनने तिबेट गिळंकृत केले , अक्साई चीन
लाटले. मात्र आपल्याच देशातील तथाकथीत अति बुद्धीमान नेते जे पंतप्रधानांना दोष
देत आहेत , डरपोक , सरेंडर (चुकीचे स्पेलिंग करून) अशा शब्दांनी हिणवत आहेत ते हे
विसरले की त्यांच्याच पणजोबांच्या नेतृत्वाखाली “हिंदी चीनी भाई भाई” करीत बसलो
आणि चीनने 1962 साली आपल्यावर आक्रमण केले पुढे 1967 या वर्षी सुद्धा युद्ध केले. 1962
मध्ये तर आपली काहीच तयारी नव्हती. “हिंदी चीनी भाई भाई” या चीन वरील फाजील विश्वासाने,
तुटपुंजी युद्ध सामुग्री असलेल्या, जुनी शस्त्रे असलेल्या व रसद पुरत नसलेल्या
आपल्या सैनिकांचा चीनच्या सैन्यासमोर निभाव लागला नाही व परिणामी आपला पराजय झाला.
ज्याचे शल्य आजही भारतीयांच्या मनात आहे. पाकिस्तानची चार आक्रमणे , सततचे अतिरेकी
हल्ले , चीनची दोन आक्रमणे, बांगलादेशी घुसखोर , रोहिंग्या घुसखोर या सगळ्यात भर
म्हणून ज्या प्रभू
रामचंद्रांना आपण सर्व मानतो , त्यांच्या सासर असलेल्या व पशुपतीनाथांचे निवास
असलेल्या इवल्याश्या नेपाळने सुद्धा आपल्याशी वाद उकरून काढला आहे. नेपाळच्या कम्युनिस्ट
सरकारच्या पाठीशी चीनी कम्युनिस्ट सरकार आहे हे स्पष्ट आहे. 8 देशांच्या सिमा
आपल्या देशाशी जुळलेल्या आहे त्यातील पाकिस्तान , चीन आणि आता नेपाळ यांच्यासह सीमावाद
निर्माण झाला आहे. यांच्यासोबतचा वाद आपण कसा निस्तरतो यावर आता पुढील शेजा-यांशी
आपले संबंध आधारीत आहेत. आपण यांना आज खमके राहून थोपवू शकलो तरच भविष्यात आपल्या
सीमेला लगत ज्यांची सीमा आहे ते देश वचकून राहतील नाहीतर ते सुद्धा आपल्यावर
कुरघोडी करण्याच्या प्रयत्न करतील. या पार्श्वभूमीवर नेहमीच आपले शांततेचे,
बचावात्मक धोरण उगाळत बसून चालणार नाही आपल्या पवित्र्याहून जगाला व आपल्या
उपद्व्यापी शेजा-यांना आपल्याशी वाद उकरून काढण्याच्या आधी दहा वेळा विचार करावा
लागेल असे आपणास खमके व्हावे लागेल आणि या कामात देशातील सर्वपक्षांना राष्ट्रीय विचाराने
एकत्र यावे लागेल. जे पक्ष जे नेते राष्ट्र प्रथम हे मानणार नाही जनतेने त्यांना
ओळखून त्यांना धडा शिकवावा तरच या देशाचा निभाव लागेल.