“अनुभवाचे” बोल

“ मैं हिंदुस्तानियों को challenge करता हूँ, एक तारीख़ तय करो और देश की minorities के सामने एक घुटने पे झुक के दिखाओ। करते हो #२अक्टूबर को? माफ़ी माँगते हैं इतने सालों की। Twitter FB से आगे निकलो।“
असे या अनुभव
सिन्हाचे व्टीट आहे.
काय तर म्हणे, “हिंदूंस्थान्यांनी एका गुडघ्यावर झुकून (Courting) अल्पसंख्यांकांची माफी मागावी” या सिन्हाला आताच
अशी उपरती का यावी ? तर याचे कारण आहे अमेरिकेत उसळलेला वर्णव्देश. तेथील लिबरल
लोक कृष्णवर्णीयांची माफी मागत आहे. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आपल्या देशात सतत होत
असतेच. संगीत, कथानक , वेशभूषा इ ची शैली अगदी जशीच्या तशी आपल्या चित्रपटात (काही
सन्मानीय अपवाद वगळता) कॉपी करणारी व तसे चित्रपट काढून गल्ला भरणारी आपली चित्रपटसृष्टी
या अंधानुकरणात विशेष अग्रेसर आहे. तिकडे लिबरल लोकांनी माफी मागितली तर इकडे
त्वरीत अनुभव सिन्हा यांनी त्यांचीच री ओढत अल्पसंख्यांकांच्या माफीचे टुमणे
काढले. काही गरज? आणि का म्हणून माफी मागायची ? अल्पसंख्यांकांतील काहींमुळे या
देशात आजही अराजकता आहे, पाकीस्तानचे झेंडे फडकतात, ज्या अल्पसंख्यांकांची माफी
मागण्याचे तुम्ही म्हणता त्यांच्यातीलच शर्जील पूर्वेकडील राज्ये तोडण्याची भाषा करतो
असे अनेक प्रश्न आहेत , देशांतील काही भांगात कोरोना काळात डॉक्टर , पोलिसांवर
झालेले हल्ले आपण नुकतेच पाहिले, काश्मीर प्रश्न आहे असे आणखी कित्येक दाखले देता
येतील. अनुभव सिन्हा यासाठी माफी मागायची
का ? अनुभव सिन्हा जरा इतिहास वाचा , सर्वच तत्कालीन इतिहासकारांनी, अगदी मुघल
साम्राज्यातील इतिहासकारांनी सुद्धा काय लिहिले आहे ते वाचा , कशी लुट झाली , कसे
धर्मांतरण झाले ? कसे अत्याचार झाले हे जरा वाचा हे वाचल्यावर कुणी माफी मागायची
हे तुम्हाला कळेल आणि मग माफी मागण्याची भाषा करा. या देशात औरंगजेबासारखे शासक
होऊन गेले की ज्याचे फर्मान सुद्धा गुडघे टेकून घ्यावे लागत असे. तुमचे गुढघे टेका
असे आवाहन करणे हे याच पठडीतले वाटते आहे. परंतू ज्याच्या दरबारात कुणाची नजर वर
करायची हिम्मत नसे त्याच औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांनी खडे बोल
सुनावून दिले होते. हा देश त्या शिवाजी महाराजांचा आहे. गुढघे टेकणारा नव्हे. निव्वळ
उचलली जिभ अन लावली टाळूला अशी वक्तव्य करून नवीन वादाला तोंड फोडू नका. इतिहासात
जरा डोकावून पहा या देशात कशी आक्रमणे झाली कशी तोडफोड झाली, या देशाला कसे लुटले
गेले हे जरा ज्ञात करून घ्या. अगदी काही वर्षांपूर्वी हिंदूंना कसे बेघर केले हे
पहा असे बेघर झालेले हिंदू तुमच्या चित्रपटसृष्टीत सुद्धा आहेत त्यांच्याशी चर्चा
करा. तसेच या देशात अल्पसंख्यांकांनी किती मोठ-मोठी पदे भूषवली आहेत ते सुद्धा जरा
स्मरण करा. तुम्ही फिल्मवाले लॉकडाऊन मुळे सध्या रिकामे आहात, त्यामुळे तुमचे डोके
ठिकाणावर नाही म्हणूनच काही बाही बरळत आहात. व्टीटर सारखे माध्यम हे चांगले विचार प्रसारीत
करण्यासाठी आहे त्यावर चांगले बोला , चांगल्या पोष्ट करा. तुम्ही माफी बाबतची जी
पोष्ट केली त्यावर तुम्हाला मिळालेल्या नेटक-यांच्या प्रतिक्रिया सुद्धा तपासा. तुमचे
हे असे वक्तव्य ऐकून जरी तुमचे नांव अनुभव असले , तुम्हाला सिनेमाचा अनुभव असला
तरी हा देश , या देशाचा इतिहास , येथील राजवटी या बाबत तुम्हाला अनुभव दिसत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा