सत्यमेव जयते
सुशांत राजपूत याची हत्या की , आत्महत्या विषय हा गेल्या कित्येक दिवसांपासून गाजतो
आहे.“सत्य समोर आणा”
या मागील लेखात गेल्या सुशांतच्या आकस्मिक निधनासह देशात यापूर्वी
कित्येक न उलगडलेले आकस्मिक मृत्यू व हत्या झालेले आहेत याचा ऊहापोह केला होता. सुशांतचा
मृत्यू होऊन अनेक दिवस होऊन सुद्धा साधा एफआयआर सुद्धा नोंदवला गेला नव्हता. बिहार
मध्ये मात्र एफआयआर नोंदवला गेला. या हत्येवरून राजकारण गरम झाले. सोशल मिडीयावर अनेकांनी
वेगवेगळी मते मांडली , कंगना राणावत
हिने फिल्मी जगतातील सत्य उजागर केले. वृत्तपत्रांतून मथळेच्या मथळे लिहिले गेले व
जात आहे. त्यातच पार्थ पवार यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना सिबिआय चौकशीची मागणी
करणारे पत्र दिले व त्यानंतर नातवाच्या कवडीचीही कवडीचीही किंमत देत नाही , तो अपरिपक्व आहे असे विधान केले तसेच सिबिआय चौकशी करण्यास
सुद्धा दुजोरा दिला होता. विरोधी पक्षाने या मृत्यूसंबंधी काहीही एक विधान केले तरी
सत्ताधारी विरोधी पक्ष राजकारण करीत आहे हेच टुमणे लावले. बिहारच्या आगामी निवडणूकींना
घ्यानात घेऊन विरोधी पक्ष राळ उठवीत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. वास्तविक राज्य सरकार
तसेच कायदा व सुव्यवस्था यंत्रणांनी राज्यात कुणाचाही मृत्यू असा संशयास्पदरीतीने होत
असेल तर त्याप्रकरणाचा तपास त्वरीत सुरू करणे अपेक्षित असते. परंतू सुशांत प्रकरणात
नेमके हेच झाले तपासात विलंब होत गेला व संशय वाढत गेला. तरुण नेत्यांवर आरोप होत आहेत.
काल सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्ग केल्यावर तस्लिमा नसरीन
यांच्या विदेशातील बहिणीसह अनेकांना आनंद झाला.
पार्थ पवार यांनी “सत्यमेव जयते” असे व्टीट करण्यास विलंब लावला नाही. राज्यातील सत्तेची
सूत्रे हाती असलेल्या आजोबांच्या नातवाने आजोबा व त्यांच्या पक्षाच्या भूमिकेपेक्षा
वेगळी भूमिका घेणे, नातवाचे
विधाने करणे , सीबीआय
चौकशीच्या मागणीचे पत्र देणे, राम मंदीराबाबत अभिनंदन करणे, त्यांच्या पित्याने मौन धारण
करणे या सर्वांमुळे “कुछ तो गडबड है“ हे तमाम जनतेला वाटत आहे. गेल्या काही दिवसांतील
पार्थ पवार यांच्या भूमिकेमुळे त्यांची भविष्यातील वाटचाल काही वेगळी राहील असा
मात्र कयास अनेकांनी काढला आहे. आता “सत्यमेव जयते” या विधानामुळे सत्य काय आहे ? निव्वळ पार्थ पवार यांनी केलेल्या
मागणीप्रमाणे घडले म्हणून “सत्यमेव जयते” आहे सुशांतची आत्महत्या नाही हे सत्य आहे की या संशयास्पद मृत्यूत राजकीय मंडळीचा किंवा फिल्मी जगतातील कुणाचा समावेश
आहे हे सत्य आहे किंवा आणखी काही वेगळे सत्य आहे काय हे आता कधी समोर येईल याची काही निश्चिती नाही. परंतू आपल्या भारताच्या “सत्यमेव जयते” या ब्रीदवाक्यानुसार विलंबाने का होईना
परंतू सत्याचाच विजय होत असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा