तारतम्य
Click "Follow" Button below To Follow this Blog
१३/०४/२०१७
The Great Shivaji Maharaj death annivarssary celebration 2017
०३/०४/२०१७
Plastic eggs found in Kolkata, article on that issue.
मेरी जान मेरी जान
‘प्लॅस्टिक’ के अंडे
कोलकाता येथील अनीता कुमारी
या महीलेस घरी आणलेल्या अंडयांचे
आम्लेट बनवताना अंड्याचे वरचे कवच जळाल्याने प्लॅस्टिक जळाल्यावर जसा वास येतो तसा वास आला आणि तीला संशय आला.त्यापुर्वीही तीच्या मुलीची प्रकृती तीने आणलेले अंडे खाल्ल्यानंतर खराब होत असे. तीला संशय आल्यावर तीने अंड्यांबाबत अधिक शहानिशा केली असता ते अंडे चक्क प्लॅस्टिकचे असल्याचे आढ़ळून आले.अनीता कुमारी यांनी तक्रार केली आणि अन्सारी नामक अंडे विक्रेत्यास अटक करण्यात आली. दीड लाखाचे नकली अंडे जप्त झाले.बहुतांश गुन्ह्यात एखाद्या विशिष्ट धर्माच्या गुन्हेगारांचेच प्रमाण जास्त का असते हा सुध्दा एक संशोधनाचा विषय आहे.आपल्या देशात माणूस Quick Money च्या मागे इतका का आकर्षीला गेला की त्वरीत पैसे कमवण्यासाठी तो युरीयाचे दूध,नकली खवा,नकली कोबी,नकली रंगाची लाल जर्द स्ट्रॉबेरी आणि आता नकली अंडे असले उपद्व्याप करायला लागला.भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षातच हे नसते उपद्व्याप सुरु झाले.1980 च्या दशकात अनिल कपूरच्या ‘मिस्टर इंडीया’ या चित्रपटात सुद्धा अन्न पदार्थात भेसळ करणारी टोळी दाखवली होती.एका जुन्या हिन्दी चित्रपटातील “|खाली डब्बा खाली बोतल” हे गीत गातांना मेहमूद म्हणतो “शहदमें गुड के मेल का डर है,घी के अंदर तेल का डर है,तम्बाखूमे घास का खतरा, सेंटमे झूटी बास का खतरा,मख्खनमे चरबी की मिलावट, केसरमे कागज की चीलावट,आटेमे पत्थर की पिसाई,व्हिस्की अंदर टींचर घुलता क्या जाने किस चीजमे क्या हो गरम मसाला लीद भरा हो |“ 60 च्या दशकातील हे गाणे आहे चित्रपट म्हणजे समाजाचा आरसाच.समाजातील घटना चित्रपटात दाखवल्या जातात.60 च्या दशकातील हे गाणे खाद्य पदार्थात भेसळ असते याची साक्ष देणारे आहे.या गाण्यावरून अंदाज करता येईल की खाद्य पदार्थात भेसळ ही अनेक वर्षापासून होत आहे.आता भेसळ तर आहेच शिवाय तंत्रज्ञानामुळे ‘प्लॅस्टिक’च्या अंडयांसारखे बनावट खाद्य पदार्थ सुद्धा बनत आहेत.काय करत आहे सरकार? कुठे गेले ते अन्न व औषधी विभाग? कुठे गेले अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय आणि त्यांचे कर्मचारी?, काय करतो आहे पोलिस खात्याचा गुप्तहेर विभाग?नागरीकांच्या तसेच लहान-लहान मुलांच्या जीविताशी खेळणारे हे समाजकंटक दंडनीय आहेत.केवळ दंडनीय नव्हे तर देहांत प्रायश्चित भोगण्याच्या लायकीचे आहेत शिवाय खाद्य पदार्थ विभागाशी संबंधीत कर्मचारी व जनतेचे रक्षण करणारे सुद्धा अकार्यक्षम आहेत,भ्रष्ट आहेत त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे असले गंभीर गुन्हे घडतात त्यामुळे संबंधीत नाकर्ते कर्मचारी व लोकप्रतिनिधी हे सुद्धा दंडनीय आहेत.भेसळ करणा-या या अतिरेक्यांच्या, होय हे सुद्धा अतिरेकीच म्हणावे, कारण हे सुद्धा जनतेच्या जीवीताशी खेळतात यांच्या हे सुद्धा ध्यानात येत नाही की कुठे तरी त्यांची मुले,त्यांचे नातेवाईक त्यांनी निर्माण हे केलेले भेसळयुक्त पदार्थ किंवा बनावट खाद्य पदार्थ खावू शकतात.हे असे करण्यास धजावतात याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे सौम्य कायदे.यांनी अपराध केल्यावर हे लगेच जामिनावर मुक्त होतात.जनतेच्या जीवीताशी खेळणा-यांना अजामिनपात्र गुन्हाच हवा,त्यांच्यावर कठोर शासनच हवे.मानवाधिकारवाल्यांनी अशा अपराध्यांच्या बाजूने उगीच लुडबुड करू नये.जेंव्हा जनतेच्या जीवावर बेतते तेंव्हा त्या जनतेच्या बाजूने मानवाधिकार वाल्यांनी येणे हे जास्त अभिप्रेत आहे.अनीता कुमारी यांच्या सारखे सर्व नागरीकांनी सुजाण आणि जागरुक राहणे आता अत्यावश्यक झाले आहे.असले गंभीर गुन्हेगार यांच्यामुळे गरीब जनता आजारी होते आणि आजारी झाल्यावर त्याला पुन्हा आर्थिक दृष्टया नागवणारे दवाखाने आहेतच.जनतेच्या आरोग्यावर परीणाम करणारे हे नीच, दुर्जन भेसळखोर यांना मायबाप सरकारने सक्तीने वठणीवर आणणे आता अत्यावश्यक झाले आहे.रस्ते बांधा,मंदीर बांधा,अनुदाने वाटा किंवा लाटा परंतू जनतेकडे जनतेच्या आरोग्याकडे सुद्धा थोड़े लक्ष दया. “मेरी जान मेरी जान खाना मुर्गी के अंडे” या गीताचा तसेच “संडे हो या मंडे रोज खावो अंडे” या घोषवाक्याचा जनहीत जाहीराती करीता उपयोग करणा-या शासनाने कोंबडीचे अंडे खावे की प्लॅस्टिकचे बनवलेले नकली अंडे खावे हे सुद्धा स्पष्ट करावे.

२७/०३/२०१७
२२/०३/२०१७
People demands lot, article describe that reduce your unexpected and various demands
भगवानने
मुंह दिया;लगे मांगने
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील नागरिकांना ‘फुकट’
मिळवण्याची सवय सरकारनेच लावून दिली आणि आपल्या देशात ‘देणारे’ कमी आणि ‘घेणारे’
जास्त झाले. विनोबांनी जमिनी दया म्हटल्यावर अनेकांनी आपल्या जमिनी “भूदान चळवळीत’
दान केल्या. त्याच देशातील लोक आता नातेवाईक, मित्र, सख्खा भाऊ यांच्या तसेच सरकारी जमिनी
हडपण्याच्या मागे लागले. आपल्या देशात आता “मांगीलाल” अर्थात सरकारकडे सतत काही ना काही
मागण्या करणारे लोक भरपूर प्रमाणात वाढले आहेत. हिंदीत मागणे या मराठी शब्दासाठी “मांग”
हा समानार्थी शब्द आहे. “हमारी मांगे पुरी करो” म्हणत अवास्तव, अवाजवी मागण्या अर्थात
“मांग” करणा-यांना "मांगीलाल" हे विशेषण लावावेसे वाटले. (मांगीलाल नांव असणा-यांनी कृपया
गैरसमज करून घेऊ नये. तसा गैरसमज करून घेतला तर या लेखा विरोधात सुद्धा काही मागणी
होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.) दररोज काही ना काही मागण्या, निवेदने सरकार दरबारी
अव्याहतपणे सुरु असते. अर्थात रास्त मागण्या असतील तर काही हरकत नाही. जेथे कुठे सरकार
चुकत असेल अथवा सरकार काही सोयी, सुविधा पर्यंत पोहचवू शकत नसेल, जनतेच्या हक्कांवर गदा
येत असेल तर मागण्या होणे जरुरीच आहे.परंतू अशा मागण्या करता-करता मग स्वत:च्याच पात्रात
तूप कसे ओढता येईल याचाच सतत विचार आणि मग स्वत:स न्याय मिळावा म्हणून सरकार दरबारी
जातांना उगीचच काहीही टुमणे लावणे, अवाजवी दुरदृष्टीहीन, देशाचे हित सोडून स्वहिताच्या
मागण्या करणे बरोबर नव्हे. मागील रविवारी नव्यानेच सुरु झालेल्या खामगांवातील प्रशासकीय
इमारती मध्ये जाण्याचा योग आला. अंमळ थोडा वेळ होता म्हणून तेथील प्रवेशद्वारा जवळ नव्या
रंग-रंगोटी केलेल्या इमारतीच्या भिंतीवर चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या मागण्यांचे एक
पत्रक चिटकवले होते ते वाचले.एक तर नवीन इमारतीवर असे पोस्टर चिटकवावे तरी कसे वाटते
देव जाणे. या पोस्टर वर एक मागणी होती की, कर्मचा-यांची शासकीय निवासस्थाने त्या-त्या
कर्मचा-याच्या नावावर करावीत. ही मागणी पाहून व्यथा, आश्चर्य असे मिश्र भाव मनात आले.
“जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडीले सर्व घरदार सोडला सुखी संसार” अशा
एका कवितेच्या ओळी आठवल्या. देशासाठी घरदारावर तुळशीपत्र ठेवणा-या त्याच हुतात्म्यांच्या
पुढच्या पिढ्यांनी अशा मागण्या कराव्यात?तुमच्यावर अन्याय होत असेल, वेतन, पगारवाढ
या बाबत वा तत्सम इतर काही मागण्याबाबत काहीही म्हणणे नाही.परंतू तुम्ही सेवानिवृत्त
झाल्यावर तुम्हाला शासकीय निवास्थान आंदण म्हणून दिले तर नवीन चतुर्थश्रेणी कर्मचा-याच्या
निवासस्थानाचे काय?त्यांची सोय सरकारने कुठे आणि कशी करायची?त्याला पुन्हा नवीन घर
देऊन ते पण नंतर त्याच्या सेवानिवृत्त्नीनंतर आंदणात द्यायचे का? क्रांतीवीर चित्रपटात
एका प्रसंगात नाना पाटेकर म्हणतो, “भगवानने मुंह दिया;लगे मांगने” त्याप्रमाणेच
आपल्या देशवासियांना मागण्याची, याचना करण्याची सवयच जडली आहे.सर्व याचक झाले आहेत. या
मागण्या करतांना काही विचार केला जातो की नाही? कुणाच्या सुपीक डोक्यातून या अशा मागण्या
निघतात. सरकार कडून काय-काय पाहिजे?तुम्ही सरकारकडे नोकरी करता तुम्हाला त्याचा मेहनताना
मिळतो, सेवानिवृत्ती वेतन मिळते, वाहन भत्ता, आरोग्य बिले, प्रवास बिले ई मिळते अजून
किती मागणार? चतुर्थ श्रेणी कर्मचारी बंधुंनो तुमच्यावर अन्याय होत असेल तर त्याचे निराकरण
व्हायलाच हवे.तुम्हाला विरोध आहे असा गैरसमज करू नये. परंतू तुमच्या वरील
मागण्यांप्रमाणे इतर सर्वच कर्मचा-यांनी अशा मागण्या केल्या तर? आपल्या मागण्या करतांना
सर्वानीच स्वहीताप्रमाणे देशाहित सुद्धा पहाणे जरुरी नाही का ?
१४/०३/२०१७
Article against Hon Minister Dilip Kamble's speech
आम्हाला काय कुणाची भीती ?
होळीच्या दिवशी आपल्या राज्याचे सामजिक न्याय राज्यमंत्री मंत्री
ना.मा.दिलीप कांबळे यांनी “घाबरायला मी काय ब्राह्मण आहे काय?” असे वक्तव्य केले.राज्यमंत्री
महोदय तुमच्या वक्तव्यामुळे ब्राह्मण घाबरतात आणि तुम्ही घाबरत नाही हे सूचित
होते. मा. कांबळे साहेब ब्राह्मण हे अनंत काळा पासून या
देशाचे शुर सरदार राहिली आहेत. देशावर जेंव्हा जेंव्हा संकट आले तेंव्हा तेंव्हा ब्राह्मणाने
आपली दऊत-लेखणी व पळी-पंचपात्रे सोडून ढाल तलवार हाती घेतली आहे.बाजीराव पेशवे ,बाजीप्रभू,
मुरारबाजी, पानिपतला लढणारे सदाशिवराव, विश्वासराव पेशवे “शूर आम्ही सरदार आम्हाला
काय कुणाची भीती,देव,देश,अन धर्मापायी प्राण घेतले हाती” म्हणत या देशासाठी लढले.शत्रू
आल्यावर घाबरून पळाले नाहीत.तुम्ही जर म्हणत असाल की
ब्राह्मण घाबरतात तर होय ब्राह्मण घाबरतात.पंरतू ते घाबरतात या देशाचा कायदा तोड़ण्याला,ब्राह्मण
घाबरतात ते इभ्रतीला, ब्राह्मण घाबरतात ते भ्रष्टाचार करण्याला, ब्राह्मण घाबरतात अनितीला, ब्राह्मण घाबरतात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार न
वागण्याला. तुमच्या सारखे सामाजिक न्यायखात्याचे राज्यमंत्री असूनही एखाद्या
विशिष्ट जातीबद्दल आकस ठेवणे किंवा त्या जातीची निर्भत्सना करणे हे तुम्हालाच जमू
शकते एखाद्या ब्राह्मणास नव्हे हे या देशातील कुणीही सांगेल.या देशात शिव्या
देण्यास,निर्भत्सना करण्यास एकच जात आहे ती म्हणजे ब्राह्मण याचे कारण ब्राह्मण
सर्वाना घाबरतात हे नसून ब्राह्मण सद्सद्विवेकबुद्धिने वागतात.ब्राह्मण शिकवण
अनुसरतात “सदा बोलणे नीच सोशीत जावे” हे सांगणा-या रामदास स्वामींची.ब्राह्मण
तुमच्या सारखे काहीही बोलतच नाही, अनिष्ट शब्द उच्चारत नाहीत कारण त्यांना “आम्हा
घरी धन शब्दांचीच रत्ने” हा संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा मन्त्र शिरोधार्ह आहे.“ऐसी
वाणी बोलिए मन का आपा खोये औरन को शीतल करे आपहु शीतल होय“ यांसारखे कबीराचे दोहे ब्राह्मणास
मुखोद्गत असतात.ब्राह्मण संतवचन सदैव स्मरणात ठेवतात आणि म्हणून शांत असतात. ते
शांत असतात म्हणून ते घाबरतात असे नव्हे.मा.कांबळे साहेब तुम्ही थोडे इतिहासात
डोकावले तर तुम्हाला नीडर ब्राह्मण चिडले तर काय होते हे कळेल.नंदकुळाचा नाश
केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही आणि तसे करुन अन्यायी नंदाचा नाश करणारा
ब्राह्मण तुम्हाला कळेल,पावनखिंड लढ़वणारा बाजीप्रभु देशपांडे तुम्हाला समजेल,पुरंदर
साठी लढ़णारा मुरारबाजी देशपांडे,अटकेपार झेंडे लावणारे रघुनाथराव आठवतील,पहीला
बाजीराव कसा शूर होता हे समजेल.लो. टिळक कळतील,सावरकर कळतील,गांधीजींचे गुरु गोखले
कळतील,एवढेच काय तर चवदार तळ्याच्या लढ्यात आंबेडकरांना सहकार्य करणारे ब्राह्मण
गोडबोले होते हे समजेल. कदाचित तुम्हाला हे सर्व माहीत असेल परंतू तुम्हाला हे सुद्धा
माहीत आहे की ब्रह्मणांविरुद्ध बोलल्याने काहीही होत नाही कारण ब्राह्मण हा
विवेकशील आहे आणि शिवाय त्याच्या पाठीशी कायद्याचा काही आधार नाही मग घ्या तोंडसुख.आजही
पूर्वी होता तसाच देशप्रेमी ब्राह्मण आहे, आजही तो घाबरत नाही परंतू आज तो शांत
आहे कारण त्याला आताचा कायदा त्या कायद्याचे रक्षक, आताची परिस्थिती हे सर्व
चांगलेच ज्ञात आहे. मा. कांबळे साहेब तुम्ही कोणत्या पदावर आहात निदान हे तरी
ध्यानात घ्या,तुम्ही मंत्री पदाची शपथ घेतांना काय म्हटले होते ते आठवा.सामाजिक
खात्याचा राज्यमंत्री जेंव्हा “मुस्काटात दिली असती” असे म्हणतो एखाद्या जातीचा
अनादर करतो ही तर सरळ-सरळ बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या व घटनेतील समान
हक्कांची पायमल्ली आहे.अशी पायमल्ली एखादा मंत्री करतो तर मग त्याचे अनुसरण
कार्यकर्ते,नागरीक करतील कारण “यथा राजा तथा प्रजा” तुम्ही आजच्या काळातील राजेच.
परंतू राजा हा भूपती किंवा भूपेन्द्र म्हणून ओळखला जातो. पृथ्वी ही त्याची पत्नी
आणि प्रजाजन हे त्याची लेकरे समजली जातात आणि पित्याला सर्व लेकरे सारखी
असतात.मा.कांबळे साहेब भारतातील उपेक्षित,पिडीत,दुर्बळ घटकांना मुख्य प्रवाहात
आणण्यासाठी जातीभेद दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर झटले परंतू तेच उपेक्षित,पिडीत,दुर्बळ
आता असे एखाद्या जातीबद्दल अनादराने बोलत आहेत.मा. कांबळे साहेब आज जर बाबासाहेब
आंबेडकर असते तर तुमची अशी वाणी ऐकून ते सुद्धा व्यथीत झाले असते.जेंव्हा जेंव्हा देशावर संकट आले तेंव्हा आईच्या गर्भात झुन्झाराची
रीत उमगलेला ब्राह्मण “देशापायी विसरुनी सारी
माया ममता नाती” असा आम्हाला काय कुणाची भीती ? म्हणत पुढे सरसावला आहे आणि भविष्यात
सुद्धा तसाच राहील लोक काहीही बरळले तरी.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)