निवडणूकपुर्व स्थिती आणि महायुतीच्या यशाची कारणे
महायुतीने मोठा विजय प्राप्त केला, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. महायुतीच्या या यशाची व भाजपाच्या जास्त जागा येण्याची कारण मिमांसा सुद्धा इथे करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालावरती अनेकांची भाष्ये, विश्लेषणे लगेचच येऊन गेली आहेत. आता तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण असतील यावर ऊहापोह सुरू आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार हे तिघेही दिल्लीला जात आहे. तूर्तास अशी स्थिती असली तरी पुनश्च एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालाबद्दल भाष्य करावेसे वाटते. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जेव्हा जाहीर झाली त्यावेळी कधीकाळी काँग्रेस सोबत कट्टर वैर असलेली शिवसेना तसेच शरद पवारांचा राष्ट्रवादी गट व काँग्रेस हे तिघेही मांडीला मांडी लावून बसले व नाना प्रकारे त्यांचाच पक्ष किंवा त्यांचीच आघाडी महाराष्ट्राला कशी तारू शकते, कशी पुढे नेऊ शकते असे जनतेच्या मनावर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागली. त्या अनुषंगाने विविध प्रकारचे विमर्श प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू लागली. याच काळात विविध आंदोलने सुद्धा सुरू होती व या आंदोलनाचे लक्ष्य देवेंद्र फडणवीस हे होते. त्यांच्याबद्दल विरोधकांनी अनेक आचरट विधाने केली, तसेच खालच्या स्तरावरची भाषा वापरली. सत्ताधारी पक्षात सुद्धा अजित पवार यांचा जेव्हा शिरकाव झाला तेव्हा ते जनतेला रुचले नव्हते. त्यामुळे निवडणुकीत महायुती जिंकते की महाआघाडी जिंकते अशी मतदारांमध्ये चर्चा होती. भाजपाने सत्तेसाठी अजित पवार यांना सोबत घेतले हे अनेकांना आजही आवडलेले नाही. निवडणुकीनंतर निवडणुकीचे अंदाज वर्तवणाऱ्या सर्वच अंदाजकांनी महायुती व महाआघाडी यांच्या जागा जवळपास सारख्याच येतील असे म्हंटले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र महायुती ही जास्त जागा घेऊन विजयी झाली. शरद पवार यांनी पुन्हा एकदा पावसात भिजून सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न केला परंतु शरद पवार यांचे राजकारण आता महाराष्ट्रातील जनतेच्या चांगलेच लक्षात आले आहे. जनतेला आता टिकाऊ सरकारचे महत्त्व कळलेले आहे. पाच वर्षे टिकणारे सरकार असेल तर ते फायद्याचे असते, त्याने विकासाची कामे व्यवस्थित होत असतात, पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता नसते व त्यामुळे मोठा खर्चही वाचतो हे सर्व आता सुज्ञ मतदारांच्या लक्षात आले आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का सुद्धा चांगलाच वाढलेला होता. हा मतदानाचा टक्का वाढला त्याचा अर्थ सुशिक्षित लोकांनी मतदान केले, नवतरुणांनी मतदान केले असा काढला जातो. त्यातच लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय झाल्यामुळे महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे या निवडणुकीत दिसून आले. निवडणुकीच्या पूर्वी अनेकांनी महाराष्ट्रात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असा अंदाज वर्तवला होता. भाजपच्या जागा घटतील असेही अनेक लोक म्हणत होते परंतु प्रत्यक्षात मात्र महायुतीने मोठा विजय प्राप्त केला, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. महायुतीच्या या यशाची व भाजपाच्या जास्त जागा येण्याची कारण मिमांसा सुद्धा इथे करणे आवश्यक आहे. भाजपाने विकासाची कामे प्रामाणिकपणे राबवण्याचे धोरण राबवले आहे. तसेच विकासाची कामे करताना सबका साथ सबका विकास हे भाजपाचे धोरण असल्यामुळे सर्वांनाच भाजप हा पक्ष व्यवस्थित काम करू शकतो, सर्व घटकांसाठी काम करू शकतो अशी खात्री वाटली. तसेच पुर्वीचे जे लायसन्स राज होते ते बंद झाले. उद्योग, लघुउद्योग, घरगुती उद्योग हे सुरू होण्यात जे अडथळे होते ते आता राहिलेले नाही, उद्योग लवकर कसे सुरू होतील याची काळजी भाजपाने घेऊन तसे धोरण अवलंबले आहे. भाजपा शेतकरी विरोधी आहे असा सुद्धा एक विमर्श प्रस्थापित झाला होता परंतु गतकाळात महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली कामे बघता शेतकरी वर्ग सुद्धा यावेळेस महायुतीच्या पाठीशी उभा राहिला आहे असे दिसते. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात झोकून देऊन काम केले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगवर भाजपाचा जोर आहे, लोकांना रोजगार, चांगले रस्ते, शिवारात पाणी हवे आहे ते मिळत आहे. यावेळी बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामुळे सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसली. तसेच महायुतीच्या योजनांचा लाभ हा सर्वच नागरिकांना झाला त्याचप्रमाणे तो मुस्लिम नागरिकांना सुद्धा झाला आहे. मुस्लिम कुटुंबे मोठी असतात त्या मोठ्या कुटुंबांमध्ये लाडकी बहिण योजनेची येणारी रक्कम ही फार मोठी आहे त्यामुळे मुस्लिम महिलांचे मतदान सुद्धा महायुतीला झाल्याचे दिसते. तसेच घरकुल योजनेचा लाभ सुद्धा अनेक मुस्लिमांना झाला आहे. या सर्व कारणांमुळे नागरिकांनी महायुतीला भरभरून मतदान केले असे दिसून येते. भाजपाचे मायक्रो प्लॅनिंग , संघ परिवाराने 100 टक्के मतदान होण्यासाठी केलेले कार्य हे सुद्धा महायुतीचे उमेदवार निवडून येण्याचे एक महत्वाचे कारण आहे. ईव्हीएम घोटाळा वगैरे हे काहीही नाही. ईव्हीएम हॅक होत नाही. ती नेटशी कनेक्ट नसते. लोकसभेत जेव्हा विरोधकांना जास्त जागा मिळाल्या, झारखंडमध्ये सुद्धा जास्त जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगली आणि हारले की मात्र ईव्हीएम घोटाळा असे कसे काय? यावेळी निवडणुकांच्या आधी उद्धव ठाकरे यांची सततची तीच-तीच वाक्ये, संजय राऊत यांचे वारंवार मीडियासमोर येऊन त्वेशात बोलणे, फडणवीस शिंदे यांची हेटाळणी करणे त्यांना सतत गद्दार, मिंधे अशी नाना प्रकारची संबोधने हे महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला आवडले नाही. आताचा मतदार हा पुर्वीच्या मतदारासारखा नाही आताच्या मतदारासमोर मोबाईल आहे, विविध वाहिन्या आहे त्यामुळे त्याला सर्व राजकारण चांगल्या पद्धतीने कळते. काहीही विधाने करून त्याला उल्लू बनवता येत नाही. आजच्या मतदाराला "करेक्ट पिक्चर" काय आहे ते स्पष्टपणे दिसते हे सर्वच राजकारणी लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आजचा मतदार हा प्रगल्भ आणि सुज्ञ झाला आहे आणि त्यामुळेच त्याने विकास कोण करू शकते, टिकाऊ सरकार कोण देऊ शकते, हिताचे राजकारण महाराष्ट्राला शोभेल असे सुसंस्कृत राजकारण कोण करू शकते हे जाणून मतदान केले आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीला भरभरून यश प्राप्त झाले. महायुतीच्या यशाची हीच कारणे असतील तर इतर पक्षांना सुद्धा राजकारण हे विकासाच्या मुद्द्याभोवती करावे लागेल असेच येथे म्हणावेसे वाटते.
Ye public hay ye sab janati hay public hay aur ye hoshiyar public hay khup khup chhan lekh mala tumache sarva mate 200 % patali
उत्तर द्याहटवाभाजपा la व युती la आतापर्यंत कधीही मिळाले नाही असे भरभरून यश मिळाले आहे. महाराष्ट्र हा प्रांत देशाला दिशा देणारा प्रांत आहे. सरकारने या पुढील काळात, ऐतिहासिक कामगिरी करावी, निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराचे मतदारसंघात नियोजन पूर्वक विकास कमी करून बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, सिंचनाचे प्रश्न, समतोल विकास, सामाजिक न्याय, पर्यावरण, ग्रामविकास, सुरक्षा या बाबत अतिशय संवेदनशीलतेने काम करावे ही अपेक्षा. संघ परिवाराने फक्त निवडणूक पुरते न पहाता सरकारच्या कामगिरी वर लक्ष ठेवावे ही अपेक्षा. लेख छान लिहिलं आहेस.
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवा