चाणक्य-आवर्जून पाहावी अशी मालिका

असणारे, कुटुंबांपासून दूर आलेले, खायला अन्न, नेसायला
वस्त्र नसलेले अलेक्झांडरचे सैनिक आता युद्ध करण्यास तयार नसतात त्यामुळे व भारतात
अलेक्झांडरला भेटलेल्या अनेक साधू, संत यांच्या जीवनशैलीने, त्यांच्या अल्पसंतोषी राहणाच्या
शिकवणीने, “माणसाला मेल्यावर जागा किती लागते ?” अशा प्रश्नाने, एका साधूला काय
पाहिजे असे विचारल्यावर अलेक्झांडरची सावली अंगावर पडत असलेल्या त्या साधूचे “माझ्या
अंगावर फक्त उन पडू दे” असे उत्तर या सर्वांमुळे प्रभावीत होऊन आपली जग जिंकण्याची
मोहीम अर्धवट सोडून आपले क्षत्रप नेमून सिकंदर परतीच्या प्रवासाला लागतो.
अर्थशास्त्र , राजनीती असे ग्रंथ लिहिणा-या चाणक्याची
कुटनिती, राष्ट्रभक्ती, “शिक्षक कभी साधारण नही होता प्रलय और निर्माण दोनो
उसके गोदमे होते है |” , “जब तक राष्ट्र अपनी विरासत अपनी संस्कृती ,मुल्योंको नही
भूलता तब तक वो पराजित नही होता |” अशी शिकवण देणारा चाणक्य मात्र भारतीय जनतेला
म्हणावा तितका कळलेला नाही, का जाणून कळू दिला नाही देव जाणे. 90 च्या दशकात जेंव्हा
हि मालिका झळकली तेंव्हा सुद्धा डाव्यांनी या मालिकेला विरोध दर्शवला होता . परंतू
चाणक्याची भूमिका साकारणारे व दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेले चंद्रप्रकाश व्दिवेदी यांनी
मात्र यास दुजोरा दिला नव्हता. 180 पुस्तके वाचून त्यांच्या आधाराने , कोणतीही गोष्ट
मनाने न टाकलेली हि मालिका सर्वानीच विशेषत: शिक्षक व विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहवी
अशी आहे. चाणक्याने दिलेली राष्ट्रप्रेमाची शिकवण, आज आपल्या देशातील जात , धर्म, राज्यांची
सीमा, भाषा यांवरून भांडणा-या जनतेने व असे मुद्दे उचलून धरून आपला राजकीय स्वार्थ
साधणा-यांनी “हिमालयसे लेके समुद्र पर्यंत भूमी का कण कण मेरा है और उसे अपनी गौरवशाली
मातृभूमी कहनेका मुझे अधिकार है |” अर्थात समस्त भारत देश आपला आहे तसेच कोरोनासारख्या
वैश्विक व आपल्या मातृभूमीवर आलेल्या राष्ट्रीय संकटाच्या प्रसंगीही राजकारण करणा-यांनी
“जो जो इस राष्ट्र की एकता और उत्कर्षके मार्ग बाधा होगा उसका विनाश होगा” अशी
चाणक्याची शिकवण विसरता कामा नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा