Click "Follow" Button below To Follow this Blog

०४/०४/२०२०

Article on the youths who traveled more than 700 km on foot due to Corona lock down but not complaining against system and PM

पीएम मोदीजी को परेसान नही करेंगे

या लेखाचे जे शीर्षक आहे ते वाक्य म्हणजे देशातील तळागाळातील जनतेच्या मनातील भावना आहेत. आता असे काही बोलले की काहींना लगेच “भक्त“ वगैरे असे वाटायला लागते. पंतप्रधानांनी काही चांगले केले व त्याविषयी जनतेने प्रशंसा केली की लगेच त्या प्रशंसकास काही मंडळी “भक्त” म्हणून संबोधित करायला लागते. असे जर असेल तर त्यांना सांगावेसे वाटते की राष्ट्राच्या हितासाठी जो कुणी पुढे येईल , जो कुणी प्रथम देशाचा विचार करेल , जो कुणी देशातील सर्व जनतेचा विचार करणारा असेल मग तो कुण्या का पक्षाचा, जातीचा, धर्माचा, वंशाचा असेल तर अशा व्यक्तीचे लोक भक्त होतीलच. सध्या जगावर तसेच आपल्या भारतमातेवर कोरोनाचे संकट कोसळले आहे. कित्येक लोक विस्थापित होत आहेत. लॉक डाऊनमुळे कित्येक लोक पायी वाटचाल करीत आपल्या गावाकडे चालले आहेत. हे लोक अगदी सर्वसामान्य आहेत , गरीब आहेत , यांचे पोट हातावर आहे परंतू “हे पण दिवस जातील” असा विश्वास बाळगून, आशावादी राहून ते जगत आहेत. अशाच सर्वसामान्य कुटुंबातील दोन तरुणांचा व्हिडीओ काल  समाज माध्यमांवर पाहण्यात आला. ते दोघे दिल्लीहून आपल्या गावाकडे पायी अंतर कापत जात होते. हातात व खांद्यावर सामान घेऊन पायपीट करीत बिचारे निघाले होते. 6 दिवसांत 700 किलोमीटर अंतर त्यांनी कापले होते त्यांना आणखी किती अंतर कापायचे काही ठाऊक नाही परंतू तरीही त्यांचे म्हणणे होते , ‘दोस्तो हम लोग गांव के लिये निकल चुके है दिल्लीसे 700 किलोमीटर पार कर चुके है , 6 दिन मे,  पीएम मोदीजी को परेसान नही करेंगे , हमे कोई बस नही चाहिये , हमको कोई आपत्ती नही है, पैदल ही चले जायेंगे , बस मोदीजी देश बचा ले , हमारे भाई और देश की जनता को बचा ले , यही मोदीजीसे निवेदन है हमारा.’ 
      यावर डॉक्टरांवर थुंकणारे , त्यांना मारहाण करणारे , पोलिसांवर दगडफेक करणारे , दवाखान्यात अश्लील वर्तन करणा-यांच्या विरोधात ब्र सुद्धा न काढणारे या दोन तरुणांच्या व्हिडीओ बाबत हा व्हिडीओ खोटा आहे, एडीट केलेला आहे , त्या तरुणांकडून तसे वदवून घेतले आहे असे मात्र जरूर म्हणतील. स्वत:ला करावी लागत असलेली पायपीट , गावात गेल्यावर लोक गावात घेतील की नाही याची शाश्वती नाही , रोजगार मिळेल की नाही ते सुद्धा ठाऊक नाही शिवाय डोक्यावर
कोरोनारुपी राक्षसामुळे असलेले मृत्यूचे भय तरीही त्याही परिस्थितीत देश मात्र वाचला पाहिजे हि भावना व देशाच्या नेत्याविषयी कोणत्याही प्रकारचा तक्रारीचा सूर नाही. कुठून आली हि सकारात्मकता , हा विश्वास? तर याचे उत्तर कुणी भक्त म्हणो किंवा आणखी काही म्हणो मात्र पंतप्रधानांची निरपेक्ष वृत्ती, ते जे काही करीत आहेत ते देशासाठी करीत आहे, त्यांची सकारात्मक वृत्ती, गरीबांबाबतची कणव, राष्ट्राच्या शत्रू विरोधात कठोर पाऊले उचलणे हेच आहे. यांमुळे त्यांच्याबाबत सर्वसामान्य जनतेत मोठा विश्वास निर्माण झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पत्रकारिता करीत असलेल्या रजत शर्मा यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी अशाच स्वरूपाच्या भावना व्यक्त केल्या होत्या. कोरोनारुपी संकट जरी जगावर आपल्या मातृभूमीवर घोंघावत असले तरी जनतेला मात्र आपल्या नेत्यावर दुर्दम्य विश्वास आहे ,आपला देश सुद्धा वाचला पाहिजे भलेही स्वत:ला 
त्रास झाला तर चालेल परंतू आपल्या नेत्याला मात्र दोष देणार नाही, स्वत: त्रास सहन करू परंतू ,”पीएम मोदीजी को परेसान नही करेंगे” हीच समस्त देशवासीयांच्या  मनातील भावना ते दोघे तरुण बोलून गेले.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा