स्वामी विवेकानंद यांचा ‘प्लेग मैनिफेस्टो’ आणि कोरोना
चीनच्या वुहान शहरातून जगभर पसरलेल्या
कोरोना वायरस व त्यामुळे होत असलेले मृत्यू हा सध्या सर्व वृत्तांचा
केंद्र बिंदु झाला आहे. यावेळी आठवण होते ती स्वामी विवेकानंद यांच्या प्लेग मैनिफेस्टोची.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना वायरस ला महामारी घोषित केले
आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाने आजपावेतो जगभरात हजारो लोकांचा मृत्यू झाला
आहे. चीनच्या वुहान शहरातून जगभर पसरलेला हा विषाणू सध्या बातम्या,अहवाल,समाज
माध्यमे यांचा केंद्र बिंदु झाला आहे.अशा प्रकारची परिस्थिती ही भारतासाठी किंवा
जगासाठी नवीन नाही. इबोला, सारस, स्वाईन फ्लू,
असे व्हायरस यापूर्वी सुद्धा आलेले आहेत. तसाच परंतू पूर्वीच्या पेक्षा अधिक भयंकर
कोरोना हा विषाणू आहे. या विषाणूस रोखण्यासाठी अद्याप औषध निर्माण
झाले नाही आणि ते होण्यास काही कालावधी लागू शकतो. जगातील अनेक देश अनेक दिवसांपासून या
कोरोनावायरसच्या संक्रमणाशी झुंज देत आहे. या पार्श्वभूमीवर आठवतो तो 1899 या वर्षी बंगालमध्ये
आलेल्या प्लेगच्या महामारीवरचा स्वामी विवेकानंद यांचा ‘प्लेग मैनिफेस्टो‘. हा मैनिफेस्टो आपल्याला मनोवैज्ञानिक तसेच
भावनात्मक रूपाने या समस्येशी लढण्याची शक्ती निश्चितच प्रदान करेल. स्वामी
विवेकानंदांचा ‘प्लेग मैनिफेस्टो’ हा बंगाली व हिंदी भाषेत तयार केला गेला
होता आणि तो स्वामी सदानंद व भगिनी निवेदिता यांनी मोठ्या मेहनतीने अनेक
लोकांपर्यंत पोहोचवला होता. या प्लेग मैनिफेस्टो मध्ये विवेकानंद म्हणतात की, ‘कोणत्याही भयापासून मुक्त राहा कारण भय हेच
सर्वात मोठे पाप आहे. आपल्या मनास नेहमी प्रसन्न ठेवा. मृत्यु तर अपरिहार्य है, त्याचे भय कशाला बाळगावे? कायर लोकांना
मृत्यूचे भय सदैव दु:खी करीत असते.’ त्यांनी या भयाला दूर ठेवण्याचा आग्रह
केला व म्हटले , “आपण सर्वानी ही खोटी भीती सोडायला हवी आणि देवाच्या कृपेवर ,
त्याच्या करुणेवर श्रद्धा , विश्वास ठेवावयास हवा. आपण आपल्याला शक्य ती सेवा
करावयास हवी. शुद्ध व स्वच्छ जीवन वृत्ती अंगीकारावी. रोग, महामारीची भीती वगैरे
भगवंताच्या कृपेने नष्ट होऊन जाईल.’ विवेकानंद म्हणाले होते की , ‘घर आणि परिसर, खोल्या, कपड़े, गाद्या, नाल्या इत्यादी नेहमी स्वच्छ ठेवाव्या. शिळे
व खराब अन्न खाऊ नये, ते नेहमी ताजे
व पौष्टिक असावे . कमजोर शरीरात आजाराची शक्यता अधिक असते.
महामारीच्या कालावधीत क्रोध आणि वासनांपासून
दूर राहावे. त्यांनी अफवांना न घबरण्याचे आणि त्यांच्याकडे लक्ष न देण्याचे सांगितले.’
भगिनी निवेदिता आणि
स्वामी विवेकानंद यांच्या शिष्यांनी कलकत्ताच्या लोकांची सेवा करण्यासाठी
रात्रंदिवस परिश्रम केले. स्वामीजींनी लोकांना म्हटले की, ‘बंधुंनो जर
तुम्हाला मदत करण्यासाठी कोणीही नसेल तर बेलूर मठातील श्री भगवान रामकृष्णांच्या
सेवकांना त्वरीत कळवा. मदतीत काहीही हयगय होणार नाही.’ मार्च, 1899 मध्ये कोलकाता येथे प्लेगची साथ पसरली
होती. रामकृष्ण मिशन ने प्लेग निवारणासाठी एक समिति गठीत केली, ज्यात भगिनी
निवेदिता या सचिव, स्वामी सदानंद हे पर्यवेक्षक आणि सदस्य म्हणून
स्वामी शिवानंद, नित्यानंद और आत्मानंद हे होते.कोलकाता येथे मार्च 1899 मध्ये प्लेग विरोधात
लढण्यासाठी कार्य सुरु केले गेले जे शहराच्या इतिहासात अजरामर आहे. स्वामी सदानंद हे
संगठन कुशल होते, त्यांनी शम्बाजार, बाघबाजार आणि इतर भागातील गलीच्छ् वस्त्यांची सफाई
सुरु केली. सफाई कामगारांच्या एका गटाच्या समवेत ते साफ सफाईच्या कार्यास लागले.5 एप्रिल रोजी, भगिनी निवेदिता, यांनी या
कार्याच्या समन्वयक या नात्याने आर्थिक मदतीसाठी वृत्तपत्रातून आवाहन केले. भगिनी
निवेदिता यांनी ने स्वामी विवेकानंद यांच्यासह प्लेग बद्दल जन जागृतीसाठी व्याख्याने
दिली.
21 अप्रैल रोजी
त्यांनी ‘द प्लेग एंड स्टूडेंट्स ड्यूटी’ या विषयावर क्लासिक
थिएटर मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भगिनी निवेदितांनी त्यांना विचारले , ‘तुमच्या पैकी
किती विद्यार्थी झोपड्या व वस्त्या सफाईसाठी येतील?’ त्यांचे हे
व्याख्यान ऐकून अनेक व्यक्ती व विद्यार्थी मदतीसाठी पुढे सरसावले. हे पूर्ण कार्य
कुशल संगठनाने करण्यात आले . ज्यात भगिनी निवेदितांनी प्लेगसह लढण्यासाठी असलेल्या
उपायांच्या छापील पत्रकांचे वितरण केले. एक दिवस स्वयंसेवक कमी होते तेंव्हा
त्यांनी स्वत:च सफाई कार्य करणे सुरु केले हे पाहून त्या भागातील तरुणांना लज्जा
वाटली व झाडू घेऊन ते मदतीस पुढे आले. भगिनी निवेदिता यांच्या या कार्याचे
प्रत्यक्षदर्शी डॉ राधा गोबिंदा हे होते जे एक प्रख्यात चिकित्सक होते. त्यांचे
उद्गार आहेत ‘चैत्र महिन्यात दुपारी जेंव्हा मी घरी चाललो होतो तेंव्हा रुग्ण तपासणी
नंतर मी एका युरोपीय महिलेस एक धूळ असलेल्या खुर्चीत बसलेले पाहिले. त्या भगिनी निवेदीता
होत्या. काही माहिती घेण्यासाठी त्या आल्या होत्या’. भगिनी निवेदिता यांच्या ‘स्टडिस फ्राम ए ईस्टर्न होम’ या पुस्तकात त्यांनी ‘द प्लेग’ या लेखात
प्लेग निवारण कार्याची माहिती दिली आहे. कूलस्टन या आपल्या मैत्रिणीस त्यांनी एक
पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी लिहिले होते की,’इथे खूप कार्य आहे, इथे
राहणे हे सुद्धा एक मोठे कार्यच आहे’. भगिनी निवेदिता व त्यांच्या सहका-यांनी
यांनी प्लेग निवारण कार्य कित्येक दिवस सुरु ठेवले होते.
याचप्रकारे वर्तमान परिस्थितीत ‘कोरोनावायरस’ बाबत जे भय,अफवा,कोरोना अधिक पसरावा म्हणून प्रयत्नशील
असलेले समाजविघातक, देशद्रोही लोक या सर्वांवर आपल्याला मात करायची आहे. तसेच स्वामी विवेकानंदांचा संदेश आणि भगिनी निवेदिता यांच्या कार्याचे स्मरण ठेऊन
सावधानता बाळगायची आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार हे आपण्यास जी काळजी घेण्यास
सांगत आहे ती काळजी आपण घेणे जरुरी आहे ते आपले कर्तव्य सुद्धा आहे.
(विवेकानंद केंद्र च्या उत्तर प्रांताचे युवक प्रमुख श्री निखिल यादव , यांच्या हिंदी
लेखाचा स्वैर अनुवाद)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा