दे दारू
.... दे दारू
“संसार
उध्वस्त करी दारू बाटलीस स्पर्श नका करू“ , “नशा करी चालकाची दशा” अशी घोषवाक्ये लहानपणापासून
एकण्यात होती काका दारूबंदी अधिकारी होते. खेड्यापाड्यात दारूमुळे अनेक संस्कार उध्वस्त
होत असतात म्हणून दारूबंदी अधिकारी या नात्याने आमचे काका व त्यांची टीम खेड्यापाड्यात
प्रोजेक्टर घेऊन जात व दारुचे दुष्परीणाम सांगणारे “माहितीपट” दाखवत.त्या माहितीपटांच्या शेवटी वरील आशयाची घोषवाक्ये असत. लहानपणीच
हे माहितीपट पहाण्यात आल्याने दारूचे व्यसन वाईट असते हे कळले. पुढे मोठे झाल्यावर
शासनच दारूबंदी खाते चालवते व शासनाला मोठा महसूल सुद्धा दारू मुळेच मिळतो हे कळले.
आता तर Lock Down च्या काळत दारू महात्म्य आवळले जात आहे. कोरोनामुळे झालेल्या Lock
down मुळे तळीरामांची मोठीच अडचण झाली. सोशल माध्यमातून मग त्याला वाचा फुटली. वाईन
शॉप्स थोडा वेळ तरी उघडावे असे म्हणत तळीरामांच्या मदतीस सर्वप्रथम धाऊन आला लव्हर
बॉय ऋषी कपूर. तमाम मद्यप्रेमींच्या मनात ऋषी बद्दल मोठा आदर निर्माण झाला.
त्यानंतर अनेक कवी, शीघ्रकवी यांनी कविता केला, लिखाण झाले. Lock down ला आज एक महिना
झाला त्यामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था, औषधी दुकानात सापडलेला दारू साठा , स्वत:च्याच
बार मध्ये दारू चोरी झाल्याचा बनाव, तळीरामांची(यात अनेक सेलिब्रेटी सुद्धा आहेतच)अडचण
आणि सर्वात मुख्य म्हणजे दारू व्यवसायातून मिळणारा महसूल हे सर्व हेरून राजसाहेब
ठाकरे यांनी राज्यसरकारला पत्र लिहून दारूची दुकाने सुरु ठेवण्याची मागणी केली आहे.दारूमुळे
राज्य सरकारला 41.66 कोटी रुपयांचे अबकारी शुल्क दररोज तर महिन्याला 1250 कोटी आणि
वर्षाला 15000 कोटी मिळतात. “Lock Down पुढे किती दिवस राहील ह्याचा अंदाज नाही
ह्यावरून आपण किती महसूल गमावलाय आणि गमावू ह्याचा अंदाज येईल,” असं राज यांनी म्हटलं आहे. या पत्रामध्ये राज ठाकरे
यांनी पोलीस, नर्सेस आदींच्या कीट, सरकारी कर्मचा-यांचे पगार, ‘वाईन शॉप्स’तून
मिळणारा मोठा महसूल या बाबींवर भाष्य केले आहे. “टाळेबंदीच्या आधी दारूची दुकानं
सुरूच होती म्हणून आता कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारने निर्णय
घ्यावा. मराठीत म्हण आहे ना ‘ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं’ त्याप्रमाणे राज्याला महसुलाची गरज आहे हे वास्तव स्विकारलं पाहिजे. कोरोना या विषाणूच्या आपत्तीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सरकारला नागरिकांचे प्राण सुद्धा वाचवायचे आहेत तसेच राज्यशकट सुद्धा हाकायचा आहे.
या राज्यशकटास दारू महसुलाचा सुद्धा आधार आहे. आता राज
ठाकरे यांच्या या पत्राचा परिणाम काय होतो याकडे आता पगारामुळे सरकारी कर्मचा-यांचे
व सर्व मद्यप्रेमींचे लक्ष लागले आहे. जर या पत्राचा काही परिणाम झाला नाही आणि
वाईन शॉप्स बंदच राहिली तर मग अनेक मद्यप्रेमींना व तळीरामांना “ दे दारू ... दे
दारू “ असेच आळवत बसावे लागणार हे निश्चित.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा