आज ज्यांचे सरकार
असते त्यांचीच वृत्तपत्रे , त्यांचाच
मिडीया असतो मग काय सर्व काही लहान मुलांच्या खेळासारखे सुरु होते. मी हे प्रश्न
विचारेल , किंवा हेच प्रश्न
विचारा असे आधीच ठरवून मग मुलाखत-मुलाखत हा खेळ सुरु होतो. या विषयावर
मागील लेख होता. पहिली मुलाखत शिळी होत नाही तो परवा दुसरी अशीच एक मुलाखत संपन्न
झाली झाली. महाराष्ट्रात कोरोना धुमाकूळ घालत आहे , मुंबई मध्ये सर्वात
जास्त रुग्ण आहेत. देशात तर सरकारी कोविड रुग्णालयांची हालत खराब आहे परंतू मुलाखतींचा निव्वळ खेळ सुरू असलेल्या महाराष्ट्रात कोविडग्रस्तांना जिथे विलग
करून ठेवले जाते त्या ठिकाणच्या कोविड बाधितांची मुलाखत घ्या म्हणा जाऊन, त्यांना विचारा त्यांची
काय स्थिती आहे ती. आपलेच प्रमुख, आपलेच सहकारी यांना काय गुलगुळीत प्रश्न विचारता ! कोविड बाधितांना जिथे ठेवले आहे तिथे निर्जंतुकीकरण होत नाही, जेवण धड नसते , प्रसाधन गृहांची परिस्थिती तर अतिशय खराब आहे. हे रुग्ण बहुतांश गरीब आहेत त्यांना कुणी वाली नाही. आधीच गरीबी , लॉकडाऊनमुळे, जनता कर्फ्यू आदींमुळे त्यांचे खायचे वांदे झाले आहेत. त्यांना कुणी विचारत नाही तर दुसरीकडे हायजेनिक वातावरणात राहणा-या, कोरोनात घराच्या बाहेरही न पडणा-यांच्या मुलाखती
काय घेतल्या जातात,
त्यांना डॉक्टरांपेक्षाही जास्त ज्ञान असल्याच्या वल्गना काय केल्या जातात. साखरे बाबतच्या प्रश्नाचे हास्यास्पद उत्तर.काय
चाललय तरी काय या राज्यात? स्वत: शासकीय पूजेस जाणे दुसा-याला आभासी भूमीपूजन
करण्याचा सल्ला देणे( हिंदूहृदयसम्राटांना स्वर्गात काय वाटत असेल), कुणी
गाडीचे सुकाणू आपल्या हातात असल्याचे चित्र माध्यमांवर प्रसारीत करणे. यांच्या या
खेळ खंडोब्याला पाहून कुणी म्हणणार नाही की महाराष्ट्रावर सध्या चीनी कोरोना
विषाणूचे संकट आहे म्हणून. मागील लेखात पूर्वीची पत्रकारीता आणि सद्यस्थितीतील
पत्रकारीता यांची तुलना केली होती. आज ज्यांचा मिडीया त्यांचेच सरकार असते मग काय मिडीया हाताशी घेऊन लहान मुलांच्या खेळासारखे सुरु होते. प्रश्न उत्तरे आधीच माहीत असतात मग मुलाखत-मुलाखत हा खेळ सुरु होतो. राज्यात कोरोनाच्या काळात , आर्थिक संकटाच्या काळात , सरकारच्या चुका, अकार्यक्षमता यांवरुन जनतेचे लक्ष उडवण्यासाठी म्हणून हे असे मुलाखतींचे खेळ खेळले जातात. राज्यात सध्या कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही , एकाचा निर्णय दूसरा रद्द करतो तर काही धार्मिक निर्णयांसाठी मुरलेले राजकारणी बरोबर मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवतात. सरकारने हे ध्यानात घ्यावे की आपल्याच लोकांना मुलाखती देण्यापेक्षा प्रथम राज्याच्या प्राथमिक बाबींकडे लक्ष द्यावे. कोरोंना विषाणूचे संकट तर आहेच परंतू लोकांना त्यांच्या गरजा सुद्धा भागवायच्या आहेत , शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला आहे. ग्रामीण भागात तुमच्या ऑनलाइन शिक्षणाचा फज्जा उडाला आहे अनेक मुलांकडे स्मार्ट फोन नाही, महाविद्यालयीन परीक्षांचा घोळ आहेच , व्यापा-यांचे उत्पन्न घटले आहे , तुमच्या सरकारचा तीनचाकी अॅटो चांगला चालला आहे असे तुम्ही म्हणता. परंतू खरोखर जे गरीब अॅटोवाले आहेत त्यांचा रोजगार ठप्प आहे , राज्य परीवहन मंडळ ठप्प आहे , तुम्ही गणपतीसाठी चाकरमान्यांना कोकणात जाऊ देऊ म्हणता परंतू तिथले गावकरी वेगळीच मागणी करीत आहेत , कोणातील वादळग्रस्त अद्याप त्रस्तच आहेत आणखी कितीतरी प्रश्न आहे जे तुमच्या या "तु मुझे सुना मै तुझे सुनाऊ" सारख्या मुलाखतींनी सुटणार नाहीत त्यासाठी तुम्हाला गांभीर्याने विचार करून एक-एक प्रश्न हाताळावा लागेल जेणेकरून तुमचे व या सरकारचे अधिक हसे होणार नाही. जय महाराष्ट्र !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा