Click "Follow" Button below To Follow this Blog

०३/०३/२०२०

Ankit Sharma's body was stabbed over 400 times, The accused spit on the police in Dindoshi , article en-light this


400 वार  आणि दिंडोशीची थुंकी
   दिल्ली दंग्यात “आयबी”  अधिकारी  अंकित शर्मा यांची हत्या करून त्यांचा मृतदेह नाल्यात टाकण्यात आला. अतिशय नृशंस अशी ही हत्या होती. शवविच्छेदन करणा-या डॉक्टरांनी देखील 400 वार असलेला मृतदेह प्रथमच पाहिला. त्यांच्या हृदयाचा सुद्धा थरकाप उडाला. एखाद्या व्यक्तीस ते सुद्धा पोलीस विभागाच्या एका अधिका-यास इतके निर्घुणपणे मारणा-यांची हिम्मत किती बळावली आहे हे या घटनेतून दिसून येते. हे हल्लेखोर येथीलच आहेत की घुसखोर ? कोण आहेत हे की जे स्वत:च्या घरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणत ह्ल्ल्यासाठीची सामुग्री गोळा करून ठेवतात ?  त्या सामुग्रीचा वापर करून निरपराधांवर हल्ले करतात, जाळपोळ करतात . हे जे कुणी असोत समस्त भारतीयांनी यांचा धोका ओळखणे अत्यंत गरजेचे झाले आहे, “अखंड सावध राहावे” हा समर्थांचा संदेश सुद्धा ध्यानात ठेवणे जरुरी झाले आहे. जनतेने यांना पाठीशी घालाणारे , यांचा वापर करून घेणारे नेते अशांना ओळखावे. गुन्हेगारांना पाठीशी घालणा-या नेत्यांना राष्ट्रहितासाठी जात-पात विसरून निवडणूकीत त्यांची जागा दाखवायला पाहिजे. तिकडे अंकित शर्माची हत्या केली इकडे मोहम्मद अंसारी हा गुन्हेगार पोलिसाच्या अंगावर थुंकला. ठाण्यातील दिंडोशी येथील मोहम्मद अंसारी या गुन्हेगारास कोर्टातून नेत असतांना त्याने गाडीत पोलिसांना शिवीगाळ केली एवढे करूनही तो थांबला नाही तर चक्क एका पोलिसाच्या अंगावर तो थुंकला. पोलिसांवर थुंकण्यापर्यंत यांची हिम्मतच कशी होते ? त्या शाहरुखने दिल्लीत  पोलिसांवर बंदूक रोखली , अंसारी पोलिसांवर थुंकला , अंकित शर्माची हत्या. या सर्व घटना पोलिसांचा, कायद्याचा धाक कमी झाल्याचे दर्शवितात. पोलीस म्हटले की पांढरपेशा वर्ग चार हात लांबच राहतो. याच पोलिसांना मात्र हे निर्ढावलेले आरोपी यत्किंचीतही घाबरत नाही ! फार मोठे आश्चर्य आहे शिवाय भारतातील कायद्याची काय सद्यस्थिती आहे आणि भविष्यात ती कशी होणार हे  दर्शवणारे आहे. पुर्वी गल्लीत पोलिस आला की लोक घरात जात , कुणाच्या घरी पोलिस आले तर शेजारी-पाजारी कुजबुज करीत. असा पोलिसांचा धाक म्हणा किंवा आदरयुक्त भीती
म्हणा असे चित्र होते. आता मात्र तसे काहीच राहिले नाही. राजकीय हस्तक्षेपांमुळे पोलिसांना बरेचदा मनाविरुद्ध कारवाई करावे लागते, आपल्या गल्लाभरू चित्रपटांनी सुद्धा विनोदी, भ्रष्टाचारी पोलिस पात्रे दाखवून पोलिसांची प्रतिमा हनन करण्यास हातभारच लावला. पोलिस,जवान, निमलष्करी जवान यांच्यावर होणारे सततचे  हल्ले हे चिंताजनक आहे. पोलिसांवर हल्ले करणा-यांचा, त्यांच्यावर हात उगारणा-यांचा , अन्सारी सारख्या पोलिसांवर  थुंकण्याची हिम्मत करणा-यांचा अधिक कठोर कायदे करून बंदोबस्त करणे आता अत्यंत जरुरीचे झाले आहे अन्यथा भविष्यात हे असले आरोपी आणखी गंभीर कृत्ये करण्यास धजावतील. मानवाधिकार सारख्या संघटना सुद्धा यांच्याच बाजूने उभे राहिल्याचे अनेकदा दिसून आले आहे. पोलिस , सुरक्षा सैनिक हे सर्व कायद्याच्या बाजूने असतात, निरपराधांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत असतात यांच्यासाठी सुद्धा मानवाधिकार प्रमाणे एखादी आंतर्राष्ट्रीय संघटना असण्याची गरज निर्माण झाली आहे. अंकित शर्मा यांच्यावरचे 400 वार  आणि दिंडोशीची पोलीसांवरची थुंकी या घटनांनी जनता, राज्यकर्ते , सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तसेच कायद्याच्या रक्षकांनी त्वरीत बोध घेणे जरुरी आहे, दक्ष राहणे जरुरी आहे अन्यथा आगामी काळ अधिक कठीण होण्याची दाट शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा