वाढता ब्राह्मणव्देष , कांबळे नंतर राऊत
"आज काल जो उठतो तो ब्राह्मणांविरुद्ध
गरळ ओकतो.
२०१७ मध्ये तत्कालीन मंत्री दिलीप कांबळे हे ब्राह्मणविरोधी बोलले होते व परवा उर्जामंत्री नितीन राऊत बोलले.एखाद्या जातीचा अनादर
एखादा मंत्री करतो ही तर सरळ-सरळ बाबासाहेबांनी
लिहिलेल्या घटनेच्या व घटनेतील
समान हक्कांची पायमल्ली
आहे.अशी पायमल्ली एखादा मंत्री करतो तर मग त्याचे
अनुसरण
कार्यकर्ते,नागरीक करतील. तेंव्हा एखाद्या जाती
बद्दल आकस असणारी वक्तव्ये करणे सोडा व चांगला
राज्यकारभार करा तुम्हाला त्यासाठी निवडले गेले आहे."
वर्ष 2017 मध्ये महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन सामाजिक न्याय राज्यमंत्री मंत्री ना.मा.दिलीप कांबळे यांनी “घाबरायला मी काय ब्राह्मण आहे काय?” असे वक्तव्य केले होते. काल राज्याचे ऊर्जा मंत्री व नागपूरचे पालक मंत्री ना.मा. नितीन राऊत हे सुद्धा ब्राह्मणांवर घसरले "जे या ठिकाणी परदेशातून आले ते लेकाचे बामन आम्हाला अक्कल शिकवतील काय?" असे ते बारळले. अहो साहेब तो शब्द ब्राह्मण असा आहे बामन नाही. तुम्ही प्रथम शब्दोच्चारण योग्य करा. तुम्ही मंत्री आहात. तुमची भाषा शुद्ध असावी अशी जनतेची अपेक्षा असते. शिवाय तुम्ही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना समत्वाने पाहाल अशा स्वरूपाची ती प्रतिज्ञा असते. तरी सुद्धा तुम्हाला ब्राह्मणांचा आकस का ? तरी बरे ब्राह्मणांना मुळीच काही सवलती नाही. राऊत साहेब तुम्ही ज्या पक्षाचे मंत्री आहात त्या तुमच्या पक्षातच तूम्हाला जे परदेशी वाटतात असे कितीतरी ब्राह्मण नेते होऊन गेले. त्यांनी त्यांच्या बुद्धीने (तुमच्या भाषेत अकलेने) जे काही कायदे , नियम , तुमच्या पक्षाची विचारधारा बनवली तुम्ही तीच विचारधारा पुढे नेत आहात ना ? तुमच्या त्या नेत्यांची जी काही धोरणे , विचार होते ते सुद्धा तुम्हाला मान्य आहेत की नाही ? लोकमान्य टिळक, महात्मा गांधींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले असे कितीतरी नेते तुमच्याच पक्षाचे. जवाहरलाल नेहरू सुद्धा काश्मिरी पंडीत असल्याचे संगितले जाते. गोविंद वल्लभ पंत , राष्ट्रपती पद भूषवलेले सर्वपल्ली राधाकृष्णन व शंकर दयाल शर्मा , माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव असे कितीतरी नेते तुमच्याच पक्षाने दिले आहेत. काही वर्षांपूर्वी तुमचे राहुल गांधी सुद्धा जनेऊधारी ब्राह्मण असल्याचे , दत्तात्रय गोत्र असल्याचे सांगितले गेले. अशी नेते मंडळी जी तुमच्या लेखी परदेशातून आलेली आहे त्यांच्याच पक्षात तुम्ही आहात. तुम्हाला हे मान्य नाहीत तर मग तुम्ही या त्यांच्या पक्षात सुद्धा नसावे असे वाटते. परंतू त्यांच्याच पक्षात तुम्ही राहता, मंत्रीपद भूषवता व तुमचेच हे नेते तुम्ही परदेशातून आले असल्याचे म्हणता ? हे कसे काय राऊत साहेब ? तुम्ही आंबेडकरवादी आहात तेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार न वागणे. मंत्री असूनही एखाद्या विशिष्ट जातीबद्दल आकस ठेवणे किंवा त्या जातीची निर्भत्सना करणे हे तुम्हाला योग्य दिसत नाही. या देशात शिव्या देण्यास, निर्भत्सना करण्यास एकच जात आहे ती म्हणजे ब्राह्मण. या देशात आजकाल जो उठतो तो ब्राहमणाला शिव्या देतो. परंतू ब्राह्मण मात्र शांत असतात ते शांत असण्याचे कारण त्यांच्यावरील संस्कार हे आहे. ब्राह्मण सद्सद्विवेकबुद्धिने वागतात. ब्राह्मण शिकवण अनुसरतात ती “सदा बोलणे नीच सोशीत जावे” हे सांगणा-या रामदास स्वामींची. ब्राह्मण तुमच्या सारखे काहीही बोलत नाही, अनिष्ट शब्द उच्चारत नाहीत कारण त्यांना “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने” हा संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा मंत्र शिरोधार्ह आहे.
“ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोय औरन को शीतल करे आपहु शीतल होय“ यांसारखे कबीराचे दोहे ब्राह्मणास मुखोद्गत असतात. ब्राह्मण संतवचन सदैव स्मरणात ठेवतात आणि म्हणूनच ते शांत असतात.साहेब तुम्ही थोडे इतिहासात डोकावले तर नंदकुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही आणि तसे करुन अन्यायी नंदाचा नाश करणारा ब्राह्मण चाणक्य तुम्हाला कळेल, पावनखिंड लढ़वणारा बाजीप्रभु देशपांडे तुम्हाला समजेल, पुरंदरसाठी लढ़णारा मुरारबाजी देशपांडे, अटकेपार झेंडे लावणारे रघुनाथराव आठवतील,पहीला बाजीराव कसा शूर होता हे समजेल. लो.टिळक कळतील, सावरकर कळतील, गांधीजींचे गुरु गोखले कळतील, एवढेच काय तर चवदार तळ्याच्या लढ्यात आंबेडकरांना सहकार्य करणा-यांमध्ये ब्राह्मण मंडळी अग्रेसर होती हे सुद्धा समजेल. कदाचित तुम्हाला हे सर्व माहीत असेलही कारण तुम्ही अभ्यासू आहात परंतू तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे की ब्रह्मणांविरुद्ध बोलल्याने काहीही होत नाही कारण ब्राह्मण हा विवेकशील आहे आणि शिवाय त्याच्या पाठीशी कायद्याचा काही आधार नाही मग घ्या तोंडसुख. देशप्रेमी ब्राह्मण शांत आहे कारण त्याला आताचा कायदा त्या कायद्याचे रक्षक, आताची परिस्थिती हे सर्व चांगलेच ज्ञात आहे. एखाद्या जातीचा अनादर एखादा मंत्री करतो ही तर सरळ-सरळ बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या व घटनेतील समान हक्कांची पायमल्ली आहे. अशी पायमल्ली एखादा मंत्री करतो तर मग त्याचे अनुसरण कार्यकर्ते, नागरीक करतील कारण “यथा राजा तथा प्रजा” तुम्ही आजच्या काळातील राजेच. परंतू राजा हा भूपती किंवा भूपेन्द्र म्हणून ओळखला जातो. पृथ्वी ही त्याची पत्नी आणि प्रजाजन हे त्याची लेकरे समजली जातात आणि पित्याला सर्व लेकरे सारखी असतात. राऊत साहेब भारतातील उपेक्षित, पिडीत, दुर्बळ घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जातीभेद दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर झटले परंतू तरीही काही लोक एखाद्या जातीबद्दल अनादराने बोलतच आहेत. राऊत साहेब आज जर बाबासाहेब आंबेडकर असते तर तुमची अशी वाणी ऐकून ते सुद्धा व्यथीत झाले असते. तेंव्हा जातीभेद करणारी , एखाद्या जाती बद्दल आकस असणारी वक्तव्ये करणे सोडा व चांगला राज्यकारभार करा तुम्हाला त्यासाठी निवडले गेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा