Click "Follow" Button below To Follow this Blog

०५/०३/२०२०

Article on Poet Bhushan (Kaviraj Bhushan) who wrote poetry on Great King Shivaji

कविराज भूषण वाचावे
वेद राखे विनीत पुराण प्रसिद्ध राख्यो रामनाम राख्यो अति रचना सुधीर मे |

हिंदून की चोटी राखी रोटी राखी है सिपहन की |
कंधे पे जनेऊ राख्यो माला राखी कर मे |

मोडी राखी मोगल मरोडी राखी पातशाह |
बैरी पिसी राख्यो वरदान राख्यो कर मे |

राजन की हद राखी तेजबल शिवराय
देव राखे देवल स्वधर्म राख्यो घरमे ||

अर्थात शिवरायांनी वेद व पुराणाचे रक्षण केले, लोकांच्या ओठावर रामनाम कायम ठेवले , हिंदूंची शेंडी व सैनिकांचा रोजगार व खांद्यावरचे जानवे , हातातील जपमाळ या सर्वांचे रक्षण केले . मोगलांवर वचक ठेवला , शत्रूंना गारद केले सीमांचे रक्षण केले , देव व देवळांचे सुद्धा रक्षण करून स्वधर्माचे सुद्धा रक्षण केले. कविराज भूषणच्या या ओळींचा हा असा अर्थ आहे. 
प्रा सुमंत टेकाडे यांचे शिवरायांच्या इतिहासाचे सदर दैनिक तरुण भारतात दर रविवारी प्रकाशित होते. गत दोन रविवार त्यात कविराज भूषण यांचे बाबत सर्वांगसुंदर माहिती होती. ती वाचूनच कविराज यांचेविषयी तसेच शिवाजी महाराज व त्यांच्याच नावाचा वापर चातुर्याने करून समाजात नव्याने जातीय विद्वेष पद्धतशीरपणे पसरवण्याचे कार्य महाराष्ट्रात केले जात आहे त्याबाबत लिहिण्याची इच्छा झाली.    
कविराज भूषण हे नांव महाराष्ट्रात ठाऊक असणारे क्वचितच असतील. शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून कवि भूषण हा उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आला होता त्याने अनेक कवितातून शिवरायांची महती सांगितली आहे. त्यातीलच एका कवितेतील या ओळी. शिवराय धर्मनिरपेक्ष होते हा समज पसरवू पाहणा-या, त्यांच्या सैन्याची धर्मनिहाय टक्केवारी वगैरे सांगणा-यांना तर कवि भूषण ज्ञातच नसावा किंवा ज्ञात असुनही जाणून बुजून त्याच्या कविता जनतेसमोर आणण्याची त्यांची मानसिकता नसावी किंवा आपली मतपेढी सुरक्षित राहवी, खुश राहावी म्हणून शिवरायांचा त्यांना हवा तसा इतिहास ते मांडतात. शिवाजीराजांना धर्मनिरपेक्ष म्हणून चितारतांना ही मंडळी उपलब्ध इतिहास , दस्तऐवज , तत्कालीन दाखले हे सर्व विसरतात. समर्थांनी शिवरायांना मार्गदर्शन केल्याचे दाखले, पुरावे आजही उपलब्ध आहेत. त्यावर  “शिवसमर्थ योग” या नावाने पुस्तकच निघाले आहे. तरीही हे लोक समर्थांना मानण्यास तयार नाही. ज्या शिवरायांनी सकल महाराष्ट्रवासियांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले त्याच महाराष्ट्रातील काही मंडळी मात्र जातीभेद कायम राखण्यावर टपून बसली आहे. याउलट उत्तरप्रदेशातील एक कवि शिवरायांची महती ऐकून महाराष्ट्रात येतो आणि शिवरायांचे अगदी सुयोग्य असे वर्णन आपल्या काव्यातून करतो. याचा समस्त महाराष्ट्रवासियांनी विचार करणे आवश्यक आहे. केवळ विचारच नव्हे तर चौफेर वाचन करून , चौकस बुध्दीने जाती-जातीत , समाजात फुट पाडणा-यांना व त्याचा राजकीय
 लाभ उठवणा-यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. सतत एकाच जातीच्या मागे लागल्यामुळे या अशा लोकांचा डाव आता जनतेच्या सुद्धा चांगलाच लक्षात आला आहे. एकाच जातीच्या विनाकारणच्या व्देशामुळेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तानाजी या चित्रपटातील शिवरायांचे गुणगान करणा-या ओळींना प्रदर्शनापूर्वीच कात्री लावली गेली. मतांकडे डोळे असलेली मंडळी शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास निर्माण करून तो दृढ करण्याच्या प्रयत्नात आहे. महाराष्ट्रातील जनतेने शिवाजी महाराज यांना अधिक चांगले जाणून घेणे, त्यांच्याबाबतची अधिकाधिक पुस्तके वाचणे, माहिती मिळवणे अत्यंत जरुरी आहे. शिवाजी राजांचा समकालीन असलेल्या कवि भूषण याच्या कविता व इतरांचे तत्कालीन साहित्य सुद्धा जनतेने जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. जातीचे राजकारण करून आपली राजकीय पोळी शिकणा-यांचे ऐकण्यापेक्षा शिवरायांबाबत अधिकाधिक वाचन केले तर शिवाजी राजे अधिक चांगल्या रीतीने कळतील. महाराष्ट्रातील जनतेने चिंतन, अभ्यास करून अशा मंडळीना चांगला धडा शिकवावा व कुणी कितीही काहीही जरी सांगितले तरी सदसद्विवेकबुद्धीने विचार करून, जातीभेद न पाळता सदैव भगव्या झेंड्याखाली एकत्र राहावे हीच शिवाजी महाराज व कविराज भूषण या दोहोंना खरी श्रद्धांजली ठरेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा