Click "Follow" Button below To Follow this Blog

२१/०३/२०२०

Article about Covid-19 , Bio War and about stopping inventing such viruses

#GermWar रोखण्यासाठी UN ने पुढाकार घ्यावा   
सध्या जगात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे.अनेक देशांत कोरोनामुळे होणा-या मृत्यूंची संख्या वाढत आहे चीन , इटली सारखे देश आघाडीवर आहेत. कोरोना अर्थात #COVID-19 ने बाधित अनेकलोक हे त्वरीत निदान व उपचार झाल्याने बरे सुद्धा होत आहेत हा सुद्धा एक आशेचा किरण आहे. या आजारावर लस संशोधनाचे कार्य जोरात सुरु आहे. परंतू पेशीत गेल्यावर झपाट्याने संख्या वाढणा-या व शरीरात इतरत्र पसरणा-या या व्हायरसला रोखण्याचे अद्याप तरी औषध निघाले नाही. मागील वर्षाअखेर चीन देशातील वुहान या शहरातून या व्हायरसचा उगम झाला आणि तो जगात सर्वत्र पोहोचला. चीन जरी या व्हायरसचे खापर अमेरिकेवर फोडत आहे तरी भरमसाठ लोकसंख्या असलेल्या चीनला लोकसंख्या हा शाप ठरत आहे व लोकसंख्या कमी व्हावी म्हणून हा चीननेच हा विषाणू निर्माण केल्याची चर्चा आहे. तसेच ही सुद्धा चर्चा आहे की शस्त्राने लढल्या जाणा-या युद्धात भरमसाठ खर्च होतो , सामुग्री लागते त्यापेक्षा #Biologicalwarfare किंवा #GermWarfare केले तर ते जास्त सोयीस्कर ठरते या अशा मानसिकतेतून चीन मध्ये BIO WAR किंवा Germ War साठी सज्ज राहण्यासाठी हा विषाणू निर्माण केला व तो अनावधानाने पसरला. जर हा विषाणू चीनने खरेच BIO WAR च्या उद्देशाने निर्माण केला असेल तर पूर्वी ज्याप्रमाणे #CTBT (#ComprehensiveNuclearTestBanTreaty) हा करार अण्वस्त्र प्रसार बंदीसाठी #UN ने पुढे आणला होता तसा BIO WAR संबंधीचा सुद्धा एखादा करार निर्माण करणा-यावर #UN ने गंभीरपणे विचार करणे जरुरी आहे. हा विचार करतांना CTBT प्रमाणे जगातील महासत्तांनी जसे आडमुठे धोरण अवलंबले होते तसे न ठेवता .  
 सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।

सर्वे सुखी होवोत , निरोगी राहोत , सर्व पवित्र ते पाहो, सर्वांना काहीही कष्ट न होवो या उद्देशाने जगात सर्वत्र सुख शांती नांदण्यासाठी BIO WAR वरील संशोधन , ते करण्याचा हव्यास हे सर्व टाळावे व ते करण्यासाठी #UN ने #BWBT (#BioWarBanTreaty) असा करार त्वरीत अंमलात आणणे आता अत्यंत निकडीचे झाले आहे. Bio War रोखण्या संबधी #UN मध्ये काही विचाराधीन आहे की नाही याची कल्पना नाही परंतू असा विचार जरूर व्हावा. परंतू CTBT वर सहमती होऊ शकली नव्हती तसे हा #BioWarBanTreaty करतांना करू नये. मनुष्याने या विश्वात खूप प्रगती केली आणि तोच आता या जागाला विनाशाकडे नेत आहे. विनाशाकडे नेतांना अनेक जीवांना वेदना देत हा विनाश मानवच स्वत: ओढवतो आहे. सर्वच देशांनी  आपली साम्राज्यवादी मानसिकता , महासत्ता बनण्याचा हव्यास काबूत राखायलाच हवा. इतर राष्ट्रांपेक्षा आपण सरस , महान , सुसज्ज असावे मग इतरांचे काहीही झाले तरी चालेल अशी मानसिकता रोखण्यासाठी  #UN ने जैविक युद्ध बंदी करार / #BWBT (#BioWarBanTreaty) सारखी काही तरी उपाय योजना करायलाच हवी. तंत्रज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी ना करता जर Bio War / Germ War साठी #Corona सारखे #Virus “विनाशकाले विपरीत बुध्दी” ठेऊन  निर्माण करण्यासाठी केला तर मानव जातीचा विनाश होणे दुर नाही. कुण्या एकाच्या चुकीने जगातील समस्त नागरीकांना त्रास भोगावा लागत आहे , आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. गरीबांचे हाल खराब आहे फक्त काळजी घेणे हेच आता सामान्यांच्या हाती आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा